Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१
शेगाव व भोनगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन...
शेगाव (उमेश राजगुरे)दि.9 येथील विश्राम भवन येथे 7 सप्टेंबर रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे तर प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव गवई, ह.भ.प. संतोष वसतकार महाराज,धनगर समाज महासंघ जिल्हाध्यक्ष मनोहर पाचपोर यांची होती. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्वांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे व लक्ष्मणराव गवई यांनी राजमातेच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून उजाळा दिला.
यावेळी पत्रकार अमर बोरसे, चंद्रभान कलंबे, अर्जुन नागे, नितीन घोंगे, सुरेश फासे, सूर्यभान रेनगडे, प्रशांत नागे, नितीन पांडे, अशोक तितुर, अढाव सर, जगदेव बोरसे, रामदास घुले, धनगर धर्मपीठ जिल्हा उपाध्यक्ष संतोष दिवनाले, विजय गुरव, आर्यन पुंडे, सागर घुले, रामहरी बोरसे, गोपाल गुरव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन जिल्हाध्यक्ष मनोहर पाचपोर यांनी तर आभार पत्रकार अमर बोरसे यांनी मानले. तर भोनगाव येथे पत्रकार अमर बोरसे, ह.भ.प संतोष महाराज वसत्कार, लक्ष्मण गवई, संजय लोनाग्रे, सहदेव पातूनडे, गोपाल पाचपोहे, प्रकाश पाचपोहे, गणेश पातूनडे, गजानन पातूनडे, वैभव पातूनडे, आयुष लोनाग्रे, देविदास लोनाग्रे, किसना पातूनडे, रतन पातूनडे, प्रमोद पाचपोहे, सुनील पाचपोहे, अमोल गुरव, रोशन पातूनडे यांची उपस्थिती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा