Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

धुळे बस स्थानकाचे आमदार फारूक शाह यांचे स्वखर्चाने डागडुजीकरण..! चालकांसह विविध भागातील आलेल्या प्रवाश्यांमध्ये समाधानाचे वातावरण...!



धुळे प्रतिनिधि: धुळे जिल्हयासह शहरात यंदा झालेल्या जास्त पावसामुळे संपुर्ण बस स्थानकात मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. धुळे बस स्थानकातुन दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात आणि या प्रवासासाठी किमान ८०० ते ९०० बस वाहनांच्या सतत फेऱ्या बस स्थानकातुन होत असतात. या खड्यांमुळे अनेकदा लहान मोठे अपघात घडत होते. 

धुळे शहर बसस्थानकात रिक्षा, दुचाकी हमाली काम करणारे लोटगाड्या, माल वाहू गाड्या यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर रेलचेल होत असते. कच्चा रस्ता असल्याने बसे येतांना व बाहेर पडतांना प्रचंड प्रमाणात धुळमाती उडत असल्या कारणाने प्रवाश्यांना धुळीचा त्रास होतो. 

बस स्थानकाच्या आवारात कच्चा रस्ता असल्यामुळे व जास्तीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जमा होत असून मोठ्या प्रमाणात चिखल जमा झालेला असून बस स्थानकात प्रवाशांना व फेरीवाल्यांना देखील चालणे मुश्कील झाले आहे. यामुळे लोकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. याच्या तक्रारी धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या.
        
वरील सर्व प्रकारच्या तक्रारी धुळे शहर आमदार फारूक शाह यांच्याकडे नागरिकांनी केल्या असल्याने त्यावर आमदार फारूक शाह यांनी धुळे बस स्थानकाचे आमदार फारूक शाह यांच्या स्वखर्चाने डागडुजीकरण करून दिले. यावेळी आमदार फारूक शाह यांच्या समवेत प्रभारी विभागीय व्यवस्थापक आणि यंत्र अभियंता अहिरे रावसाहेब, वरिष्ट आगार व्यवस्थापक अनुजा दुसाणे, आगार व्यवस्थापक स्वाती पाटील, DTO प्रल्हाद घुले, कमलेश भावसार आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध