Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मार्फत शेतकरी उत्पादक कंपनी आणि संस्था बचत गट मार्गदर्शन परिसंवाद



श्री अभिजीत दादा पाटील अध्यक्ष वनश्री शेतकरी उत्पादक कंपनी हे या कार्यक्रम साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत आणि त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या नी सर्व योजना अभ्यास करून हिशोब ताळमेळ बसत असेल तर यशस्वी होतील आज सदरील कंपनी संचालक याना उद्योग पती टाटा बिर्ला सारखे महत्व प्राप्त झाले आहे 2013 पासून या योजनेस केंद्र सरकारने अधिकृत भाग भांडवल सह उभारण्याची परवानगी दिली असल्याने सक्षम आणि स्पर्धात्मक युगात काळाची गरज बनली आहे. 

असे प्रतिपादन करून 8 ऑक्टोंबर रोजी त्यांच्या वनश्री शेतकरी उत्पादक कंपनी साठी सर्व उत्तर महाराष्ट्र मधील शेतकरी उत्पादक कंपन्या ना आमंत्रित केले आहे त्यांच्या कंपनी चे शेतकरी मेळावा साठी.श्री तुषार भाऊ रंधे जिल्हा परिषद अध्यक्ष धुळे यांनी उत्पादित मालाची गुणवत्ता चांगली असेल तर योग्य भाव मिळत असल्याने सक्षम शेतकरी उत्पादक कंपन्या नी ग्रेडिंग पॅकिंग सुविधा उपलब्ध करून देऊन सरकारी योजना जिल्हा परिषद योजनेचा लाभ घेणे चे आवाहन केले.

या प्रसंगी श्री नरेंद्र सिंह जमादार अध्यक्ष थाळनेर तेलबिया संस्था यांनी आपल्या प्रास्ताविक मधे सरकारी योजनांची माहिती दिली.श्रीमती प्राची काळे कृषी तज्ञ कृषी विज्ञान केंद्र धुळे यांनी  सर्व प्रकारच्या गृह उद्योग व्यवसाय वृध्दी साठी मार्गदर्शन केले.श्री वर्मा साहेब कृषी अधिकारी प स शिरपूर श्री अतुल पाटील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अधिकारी,श्रीमती पुनम पाटील अध्यक्ष मातोश्री इंदुमती शेतकरी उत्पादक कंपनी टाकरखेडा,श्री भुलेश्वर पाटील सरपंच आणि रितेश पाटील अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी विकास संस्था कुसुंबा यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

निंबाळकर अध्यक्ष शेतकरी उत्पादक कंपनी साक्री तालुक्यातील,नेवे यावल येथील शेतकरी उत्पादक कंपनी चे अध्यक्ष,मोरे नीलकंठ शेतकरी उत्पादक कंपनी शिंदखेडा चे अध्यक्ष,श्री दिनकर पाटील Chahardi संस्था अध्यक्ष,श्री नरेंद्र सिंह सिसोदिया सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर,श्री अविनाश पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर,श्री एम सी पाटील विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे खानदेश विभाग यांनी प्रास्ताविक सूत्र संचालन आणि आभार मानले.

1 टिप्पणी:

  1. शेतकरी उत्पादक याना दिलासा देणारे वृत पत्र
    आभारी आहोत शेतकरी उत्पादक कंपन्या चे प्रतिनिधी बातमी दिली
    एम सी पाटील विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे

    उत्तर द्याहटवा

प्रसिद्ध