Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

शिरपूर भारतीय जनता पार्टी आध्यत्मिक समन्वय आघाडी शहराध्यक्षपदी संतोष महारु माळी यांची नियुक्ती

 
                         
शिरपूर प्रतिनिधी : माजी शालेय शिक्षणमंत्री आ. अमरीशभाई पटेल, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी,आ.काशिराम पावरा यांचाशी भाजपा शहाराध्यक्ष हेमंत पाटील यांनी चर्चा करुन शहारातील वरवाडे भागातील धार्मिक कामात सतत अग्रेसर असलेले संतोष माळी यांची भाजपा आध्यत्मिक आघाडी शहराध्यक्षपदी नुकतीच निवड जाहिर केली आहे. शहरातील श्रीराम मंदिर देवस्थान, (श्री भोंगे) यशवंत शाळेसमोर शिरपुर येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते संतोष माळी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील,धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, महंत सतिषदास महाराज भोंगे,भागवताचार्य प्रमोद महाराज भोंगे,मा.जिल्हा चिटणीस संजय आसापुरे,भाजपा तालुका चिटणीस सुनिल चौधरी,भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील,राधेश्याम भोई,भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, तालुकाध्यक्ष अरविंद्र जाधव,भाजपा आध्यत्मिक समन्वय आघाडी तालुकाध्यक्ष बापु पाटील, छगन गुजर,मोहन माळी, पत्रकार मनोज भावसार, बुथ अध्यक्ष राजुलाल मारवाडी, युवा कार्यकर्ते अजिंक्य शिरसाठ,काशिनाथ पाटील,भगवान राजपूत,त्र्यंबक पाटील,सागर जैन,संदीप मराठे, नामदेव पाटील,भरत मराठे,नारायण पाटील,दिपक धनगर,लक्ष्मन गोपाल, विठोबा महाजन,नंदकिशोर जैन, बाळासाहेब पाटील आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

भाजपा आध्यत्मिक आघाडी शिरपूर शहराध्यक्षपदी संतोष माळी यांची निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे सर्व प्रेमळ ,स्नेही मित्रांचे फार फार जय हरी,आभार शुभेच्छा दिल्याबद्दल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध