Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

शिंदखेडा तालुक्यातील वरुळ-घुसरे ग्रामपंचायतीत घरकुल घोटाळ्याचा पर्दाफाश ! लोकप्रतिधीसह शासकिय अधिकारी व कर्मचा-यावर टांगती तलवार !



शिंदखेडा : (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यातील वरुळ-घुसरे ग्रामपंचायतीत लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी संगनमताने अतिशय बनावट व बोगस यादी तयार करुन प्रधानमंत्री आवास योजना मनसोक्तपणे लाटली व लुटली आहे. सरळ-सरळ उघड होत आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिंदखेडा तालुक्यातील वरुळ -घुसरे ग्रामपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एकूण १९४ ग्रामस्थांची यादी मंजुर करण्यात आली. ही यादी सन २०२०-२१ साठीची असताना यात ग्रामपंचायत लोकप्रतीनिधी व ग्रामपंचायत सदस्य यांना प्रधानमंत्री आवास योजना मनसोक्तपणे लाटता यावी व सढळ हाताने लुटता यावी यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी व लोकप्रतीनिधी यांनी संगनमताने यादी कालावधीपेक्षा ५-७ वर्षापुर्वी मयत व्यक्तीची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. 

इतकेच नव्हेतरआपल्या रोजगारासाठी २०-२५ वर्षापुर्वी गाव सोडून दुसरीकडे बाहेरगावी गेलेले व ते तेथेच स्थायीक झालेल्या व्यक्तीची नावे देखील या यादीत समाविष्ट केलेली आहेत. सन २०१९ च्या ग्रामसभेत अपात्र व्यक्तीची यादी ग्रामसभेच्या ठरावानिशी गटविकास अधिकारी यांना देण्यात आली असल्याचे वृत्त आमच्या प्रतिनिधीस प्राप्त झालेले आहे. मात्र सदर यादी वाचन केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संगनमताने बदलविली की काय? अशी शंका निर्माण झालेली आहे. 

लोकप्रतिनिधी यांनी अतिशय बनावटी व्यक्ती, बनावट घरकुल, बनावट जागा दाखवून तसेच ग्रामसेवक यांनी देखिल खोटे नमुना नं. ८ सादर करून शासन निधीचा मनसोक्त लयलुट केलेली प्रत्यक्ष दर्शनी दिसून येते. तर या सर्व यादी अपात्र व्यक्तीची सभासद यादी प्राप्त झालेली असताना देखिल त्यास मंजुरी देताना कोणतीही खात्री न करता, प्रत्यक्ष पहाणी व वास्तविकता न तपासता त्यास मंजुरी देणारे वरिष्ठ अि धकारी यांच्या डोक्यावर देखील टांगती तलवार आहे. (सविस्तर वाचा पुढील अंकात...)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध