Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपुर शहरातील मच्छी बाजारात सार्वजनिक जागी पत्त्यांचा जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी मध्यरात्री छापा
शिरपुर शहरातील मच्छी बाजारात सार्वजनिक जागी पत्त्यांचा जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी मध्यरात्री छापा
शिरपूर प्रतिनिधी:शिरपुर शहरातील मच्छी बाजारात सार्वजनिक जागी पत्त्यांचा जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून १२ जुगाऱ्यांना १७ हजार रुपये रोख रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरपुर शहरातील मच्छी बाजारातील भाजी मार्केट गेटच्या आडोशाला सार्वजनिक जागी ५२ पत्याच्या जुगार खेळ खेळत आहे व खेळवित असल्याची गोपनीय माहिती रात्री गस्तीवर असलेल्या महिला पीएसआय छाया पाटील यांना मिळल्यावरून पथकाने शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला.त्याठिकाणी ५२ पत्त्यांचा खेळ सुरू असल्याचे व १२ जण जुगार खेळतांना आढळून आल्याने १२ संशयितांना जागीच पकडुन त्यांच्या ताब्यातील व डावातील १७ हजार २२० रुपये रोख जप्त करण्यात आला.
यात उदयसिंग मधनसिंग ठाकुर वडगल्ली, विकास संजय चौधरी,राहुल अनिल धनगर,ऋषीकेश चंद्रमणी आखाडे रा.भरतसिंग नगर,आसिफ शेख रहेमान शेख रा. मोहम्मदीया चोक,अमृत अशोक ढिवरे, वय बौध्द वाडा,कलीम शेख बशीर जमादार रा.कुंभारटेक कासिम शेख अजीज शेख रा.नथ्थु नगर,अशपाक बंग ईब्राहिम बंग, वय ३२, रा. मराठागल्ली इम्रान गुलाम तेली रा. लोहार गल्ली शिरपूर व शांतीलाल मधुकर पाटील,लालसिंग गुलाबसिंग राजपुत,रा. दहिवद ता.शिरपुर जि. धुळे असे १३ जणांना ताब्यात घेतले असून २ दोन जण फरार झाले आहेत त्यांच्याविरुद्ध पोकॉ स्वप्नील बांगर यांनि शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ची कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पीएसआय छाया पाटील,महीला पोलीस नाईक पौर्णिमा पाटील, पोना पंकज पाटील,पोकॉ अमीत रणमाळे,अतुल निकम,पी आर भिल यांच्या पथकाने केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी, ( दिंडोरी ): प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडी, दिंडोरी तालुक्याच्या वतीने शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता वणी येथील खुशी बँक...
-
जळगाव प्रतिनिधी:- नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. ज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा