Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
चाळीसगाव येथिल खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : गणेश खलाने
चाळीसगाव येथिल खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : गणेश खलाने
शिंदखेडा : दि.26/9/2021 रोजी चाळीसगाव येथे होत असलेल्या १४८ व्या सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषदेचे दि. २६/९/२०२१ वार रविवार रोजी सकाळी १० वाजता ठिकाण : वैभव मंगल कार्यालय, भडगाव रोड, चाळीसगाव येथे दोन सत्रात परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन मा. प्रतिभा शिंदे तर दुसर्या सत्राचे उद्घाटन मा.बाळासाहेब कर्डक यांच्या हस्ते होणार आहे.
तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. अनिताताई देवतकर, व मा. गोपीनाथ लोखंडे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात खास विषय : नवीन कृषी विधेयक २०२० काय आहे? व हे कृषी विधेयक नेमके कुणाच्या हिताचे? आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० कुणाच्या हिताचे? या विषयावर वक्ते ॲड. राहुल वाघ, धुळे व डॉ. सिद्धार्थ घाटविसाचे, मुंबई, प्रा. प्रशांत बोबडे, प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत.
तरी समस्त सत्यशोधक समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेचे शिंदखेडा येथील शहर अध्यक्ष गणेश खलाने,दिनेश माळी(मा.नगरसेवक)ॲड.चंद्रकांत बैसाने,किरण जाधव,कैलास वाघ ,पितांबर सोनवणे ,दीपक विश्वेश्वर, कल्पेश सोनवणे, अनिल माळी सर प्रविण माळी योगेश माळी वासुदेव माळी कृणाल माळी,आदीनी आवाहन केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी, ( दिंडोरी ): प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडी, दिंडोरी तालुक्याच्या वतीने शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता वणी येथील खुशी बँक...
-
जळगाव प्रतिनिधी:- नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. ज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा