Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१
शिवाजी नगर मधील साचलेले पाणी काढण्यासाठी भाऊसाहेब बावने यांनी घेतला पुढाकार
नांदुरा शहरातील शिवाजी नगर परिसरात गेल्या अनेक वर्षा पासून पावसाचे पाणी साचुन राहत होते.त्यामुळे दरवर्षी या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते येथील नागरीकांनी या बाबत नगर पालिकेला अनेक निवेदने दिलीत परंतू ही समस्या कोणीही सोडविली नाही परंतु भाऊसाहेब बावणे यांनी पुढाकार घेत शिवाजी नगर मधील समस्या कायम स्वरुपी निकाली काढलीं आहे येणाऱ्यां काळात हायवे रोड़च्यां दोन्ही बाजुने मोठ्या नाल्या व रोड होणार आहेत आमदार राजेशजी एकड़े यांनी सीमेंट रोड व दोन्ही बाजूला मोठ्या नाल्या करण्याकरीता निधी खेचुन आणलेला आहे.जे काम काही दिवसातच सुरु होणार आहे.
पण तो पर्यंत होणाऱ्या त्रासाचा विचार करता आ राजेश एकडे यांचे खंदे समर्थक श्री भाऊसाहेब बावने यांनी पुढाकार घेतला व स्वतःच्या मालकीचे जेसीबी या कामी लावले आणि शिवाजी नगर ते ज्ञानगंगा पात्रा पर्यन्त नालीचे खोदकाम करून साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करुन दिली परिसरात साचलेले पाणी काढण्यासाठी स्वतः जागेवर ऊभे राहून त्यांनी काम करून घेतले.आणि ज्या ठिकाणी रस्त्यात अडचणी निर्माण होणार आहेत त्या ठिकाणी स्वखर्चाने पाईप देखील टाकून देईल अशे आश्वासन भाऊसाहेब बावने यांनी दिले आहे.गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेली पाणी समस्या तातडीने निकाली काढल्या बद्दल शिवाजी नगर मधील नागरिकांनी भाऊसाहेब बावणे यांच्या या धाडसी कार्याबद्दल आभार व्यक्त केले आहे
या पूर्वी नांदुरा शहराचा पाणी पुरवठा तांत्रिक कारणामुळे बंद पडला असता जेसीबी चालकामुळे सदर चे कार्य अडचणीत आले असता ही बाब पाणी पुरवठा सभापती अजय घनोकर आणि पाणी पुरवठा अभियंता नीरज नाफडे यांनी भाऊसाहेब बावणे यांच्या पर्यंत पोहचवली असता त्यांनी आपल्या जेसीबी चे काम बंद ठेऊन नगर पालिकेला आपला जेसीबी चालक पाठवून दिला त्यामुळे नांदुरा शहरांचा पाणी पुरवठा सुरळित सुरू झाला होता नेहमी सहकार्याच्या भूमिकेमुळे बावणे हे सर्वत्र परिचित आहेत शिवाजी नगर मधील नागरिक त्यांनी केलेल्या कामाबाबत आनंद व्यक्त करून भाऊसाहेब बावणे याचे अभिनंदन करीत आहेत हे विशेष
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावचे रहिवासी तथा काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते वाळू क्षिरसागर यांची नुकतीच काँग्रेस सेव...
-
जळगाव प्रतिनिधी:- नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. ज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा