Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
रात्रीच्या सुमारास सार्वजनिक शौचालय शेजारी तथा रस्त्यावर पत्ते खेळण्यास मज्जाव केल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण
रात्रीच्या सुमारास सार्वजनिक शौचालय शेजारी तथा रस्त्यावर पत्ते खेळण्यास मज्जाव केल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण
शिरपूर प्रतिनिधी - रात्रीच्या सुमारास सार्वजनिक शौचालय शेजारी तथा रस्त्यावर पत्ते खेळण्यास मज्जाव केल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शहरातील किस्मत नगर मध्ये गुरुवारी रात्री घडली असून शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी समदअली सय्यदअली 40 किस्मत नगर शिरपूर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून रात्रीच्या सुमारास किस्मत नगर मधील सार्वजनिक शौचालय शेजारी मोकळ्या रस्त्यावर गुरुवारी 23 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास काही जण पत्ते खेळत असताना त्यांना खेळण्यास मज्जाव केल्याच्या रागातून कदर अहमद पिंजारी रा.किस्मत नगर याने हातात वीट घेऊन छातीवर,पाठीवर,पोटावर, तोंडावर,मारहाण करीत गुप्ती आणून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना नारायण मालचे करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी, ( दिंडोरी ): प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडी, दिंडोरी तालुक्याच्या वतीने शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता वणी येथील खुशी बँक...
-
जळगाव प्रतिनिधी:- नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. ज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा