Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगन्याचे प्रशासनाचे निर्देश
धुळे जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगन्याचे प्रशासनाचे निर्देश
धुळे, दि.26 : - मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात दि.27 व 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.असे आवाहन धुळ्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 24 ते 28 सप्टेंबर 2021 या कालावधीत नाशिक विभागातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याची सुचना निर्गमित केली आहे. ज्यामध्ये धुळे जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानुसार दि .27 व 28 सप्टेंबर रोजी धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जिल्ह्यात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे तसेच नदीकाठच्या परिसरातील गावाच्या लोकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने,पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवण्यात यावे. सर्व पुरप्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी.असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
जळगाव प्रतिनिधी:- नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. ज...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावचे रहिवासी तथा काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते वाळू क्षिरसागर यांची नुकतीच काँग्रेस सेव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा