Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर प्रतिनिधी- मनसे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महावितरण तालुका अभियंता ,व शिरपूर शहर अभियंता , शिरपूर विद्युत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले
शिरपूर प्रतिनिधी- मनसे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महावितरण तालुका अभियंता ,व शिरपूर शहर अभियंता , शिरपूर विद्युत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले
आज दि.27 रोजी मनसे व मनविसे कडून महावितरणतर्फे शिरपूर शहर व तालुक्यातील गावात सक्तीने व जबरदस्तीने विज बिलांची वसुली होत आहे . बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जात आहे . त्यासाठी ग्राहकांना कोणतीही नोटीस दिली जात नाही . तरी महावितरणची अन्यायकारक वसुली थांबविण्यात यावी तसेच मनमानीपणे वागणाऱ्या अधिका - यांची बदली करण्यात यावी ,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .
यासाठी महावितरणच्या कार्यालयासमोर मनसे व मनविसे तर्फ आंदोलन करण्यात येईल याबाबत निवेदन देण्यात आले . कोरोनाच्या गंभीर अशा परिस्थीतीत सर्वत्र आर्थिक चक्र थांबले असताना विद्युत महावितरण विभागाकडून वीज देयक भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मानसिक त्रास देत आहेत . वीज ग्राहकांना कुठलीही नोटीस न बजावता का घरातील कर्त्या पुरुषाला माहिती न देता वीज जोडणी खंडीत करण्यात येत आहे . अनेक वेळा समस्या सांगायला गेल्यावर संबंधित अधिका - याची दादागिरीच्या भाषेत बोलत असल्याचे दिसून येत आहे .
त्यामुळे सर्वसामान्यांनी समस्या कोणाकडे मांडावी असा प्रश्न आहे ,याबाबत महावितरणतर्फे तोडगा काढावा . अन्यथा मनसे व मनविसे व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ,त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देखील मनविसे व ग्रामस्थांनी दिला आहे .
यावेळी उपस्थित मनसे धुळे जिल्हा उपाध्यक्ष राकेश चौधरी, मनविसे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे, मनसे जिल्हा प्रवक्ता प्रदीप दहिवंकर, मनसे शहराध्यक्ष चेतनसिंग राजपूत, मनविसे शहराध्यक्ष सोनू राजपूत, मनसे शहर उपाध्यक्ष अमित कुरेशी, मनसे शहर उपाध्यक्ष राहूल शिराळे, मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रशांत राठोड, मनविसे शहर सचिव शोयब खाटीक, मनविसे तालुका सचिव राकेश गुजर, मनविसे गट अध्यक्ष नीरज जाधव, अमोल गुजर, किरण भिल विक्की ठाकूर, अनिल भिल, ज्ञानेश्वर भिल, जयेश पवार, राम गुजर, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
जळगाव प्रतिनिधी:- नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. ज...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावचे रहिवासी तथा काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते वाळू क्षिरसागर यांची नुकतीच काँग्रेस सेव...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा