Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

साक्री तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक 2021चा बोलबाला



साक्री तालुक्यात येऊ घातलेल्या पंचायत समिती पोट निवडणुकीत साक्री तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप अशीच बहुसंख्य लढती पहावयास मिळत आहेत. मात्र यापूर्वी महाविकास आघाडी कडे साक्री पंचायत समितीची सत्ता होती आणि आज एकूण आठ जागांवर पोट निवडणूक लढवली जात आहे 

मात्र आज ही महा विकास आघाडी ला आपली सत्ता कायम अबाधित ठेवण्यासाठी केवळ तीन जागांची आवश्यकता आहे. आणि आजचे साक्री तालुका पंचायत समिती पोटनिवडणूक 2021चे चित्र असे दिसते आहे की महा विकास आघाडी ला परत पूर्ण बहुमताने सत्ता मिळवता येईल यात शंकाच नाही, मात्र धुळे जिल्हा परिषदेत परिस्थिती काहीशी वेगळी आहे तेथे भाजपकडे स्वतःचे स्पष्ट बहुमत आहे मात्र साक्री तालुक्यातून भाजपच्या बड्या दिग्गज नेत्यांना साक्रीत फारसे यश मिळताना दिसून येत नाही आणि राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसला, तालुक्यात पूर्वीपेक्षा चांगली मुसंडी मारतांना दिसते आहे,

याचे नेमके कारण काय हे शोधणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. याविषयी नेमके तालुक्यातील  जनतेचा च्या शेतकऱ्यांचा  मनात भाजपा विषयी फारशी  प्रतिभा राहिलेली नाही म्हणून कदाचित साक्री तालुक्याचे राजकारणाला एक नवीन दिशा मिळाली आहे,असे बोलणे ही वावगे ठरणार नाही ज्यांच्या नावावर साक्री  तालुक्याची ओळख आहे असे धुरंदर राजकारणी असून देखील त्यांचा प्रभाव तालुक्यात कमी झाला आहेया असे देखील दबक्या आवाजात  बोलले जात आहे. 

याचे उदा सुरेश पाटील आणि दहिते बापू  यांची पकड तालुक्यात कमी झाली का ? म्हणून त्या तुलनेत ते यशस्वी होताना दिसत नाहीत आहेत मात्र महा विकास आघाडीकडे म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची तालुक्यात मोठं नाव नसताना देखील ते यशस्वी होताना दिसत आहेत यांचे याचे नेमके कारण शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांचा जनसंपर्क व त्यांनी केलेली विकास कामे आहेत का  असाही अंदाज लावला जात आहे आणि राष्ट्रवादीकडून संदीप बेडसे व पोपटराव सोनवणे यांचा साक्री तालुक्यात होणार हस्तक्षेप व काँग्रेस च्या गोटात जास्त मतभेद नसून पक्षनिष्ठा वर काम करणारी जुने लोक आजही काम करत आहे  

याच आधारावर महा विकास आघाडी यशस्वी होत आहे असे ही म्हणता येईल परंतु साक्री तालुक्याच्या राजकारणात यापूर्वी जी गणित लावली जात होती ती कुठे तरी फेल होताना दिसत आहेत येणाऱ्या काळात साक्री तालुक्यात भाजपचे पानिपत होणार का असाही प्रश्न जनसामान्यांकडून बोलला जात आहे

तरुण गर्जना वृत्त पत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध