Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

बीड भाजप चा नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत अचानक बिघडली रुग्णालयात दाखल



भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांनी ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांची प्रकृती लवकर ठिक व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुढील तीन चार दिवस पूरग्रस्त मराठवाडा दौरा असणार आहे. याच दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली आहे. ट्वीट करत पंकजा मुंडे म्हणाल्या की, दोन चार दिवस आराम करणार आहे. फोन कॉल घेणंही शक्य नाही. देवेंद्र फडवीस यांच्या दौऱ्याआधीच   पंकजा मुंडे यांची अचानक तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध