Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१
शिरपूर तालुक्यातील उच्चभ्रुत समजल्या जाणा-या समाजातील बाबा आणि नातु व इतर प्रतिष्ठित व्यक्तींकडून काळीमा फासणारे घाणरडे कृत्य करुन मानवी नात्याला दुषीत केले आहे.सदर व्यक्तीने महिलेचे अश्लील प्रकाराचे व्हिडीओ शुटींग व फोटो काढून ब्लॅकमेल करत त्या महिलेच्या गैरवापर करत अनेकांकडून तिच्या मर्जीविना तिच्यावर बळजबरीने शारिरीक व लैंगिक अत्याचार करून घेतले असल्याचे संबंधीत पिडीत महिले कडून आमच्या तरुण गर्जना प्रतिनिधीस रोज नविन-नविन अत्याचाराबाबत माहिती प्राप्त होत असून उच्चभ्रुत समाजातील आंबट शौकीनांचे नविन-नविन नावे समोर होत आहे. प्राप्त माहितीनुसार पिडीत महिलेने तिच्यावर ज्या-ज्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला त्या सर्व जागा, गोडावून, फार्म हाऊस यांची माहिती व अत्याचाराची पध्दत सविस्तर आमच्या प्रतिनिधीजवळ कथन केली आहे.
अत्याचार करणान्यांनी पिडीत महिलेवर अत्यंत घाणेरड्या पध्दतीने नशा करुन पिडीत महिलेची मर्जी नसतांना बळजबरीने लैंगिक अत्याचारासाठी सिगारेटचे चटके गुप्तांगावर दिलेले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस प्राप्त झाली आहे. अश्या या उच्चभ्रुत व आंबट शौकीनांमुळे अत्यंत स्वच्छ व प्रतिष्ठीत अश्या शिरपूर तालुक्याला काळीमा फासणारी आहे. पिडीत महिलेवर लगिक अत्याचार करणान्यांमध्ये हळूहळू पिडीत महिलेने नावे उघड करणे सुरु केले आहे.यातून ग्रामिण भागापासून ते शहरापर्यंतचे धागेदोरे समोर येत असून यात उच्चभ्रुत समाजातील प्रतिष्ठीत व नामांकित व्यक्तिं चा समावेश असल्याचे स्पष्ट होत आहे.
(वाचा सविस्तर भांडाफोड पुढच्या अंकात)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा