Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१
एसबीआय होळनांथेत अजब प्रकार तक्रार न सोडवता तक्रारदारांचीच चोकशी..!
बभळाज / प्रतीनीधी भारतीय स्टेट बँक शाखा होळनांथेचे शाखाधिकारी ग्राहकांना उद्धट वागणुक देत असुन कर्ज मागणा-यांना शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असुन अपमानास्पद वागणूक देत आहे.जाब विचारण्या-यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने या शाखाधिका-यावर कार्यवाही करण्याची होळनांथे परीसरातील ग्राहकांनी वरीष्ठांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या.हा अडेलटट्टु अधिकारी शेतक-यांच्या भल्यासाठी आहे की जिवघेण्यासाठी अशा संतप्त भावना व्यक्त होत आहे.
ग्राहकांच्या निवेदनाची दखल घ्यायला आलेल्या अधिकाऱ्यांकडून तक्रारदारांची चौकशी होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.होळनांथे येथील एसबीआयच्या अजब कारभार, पत्रकारांवरही गुन्हा दाखल करण्याची धमकी.येथील भारतीय स्टेट बँकेतील अधिकारी यांच्या मनमानी कारभारा संदर्भ येतील शेतकरी खातेदार कर्जदार व्यापारी च्यासह परिसरातील ग्रामपंचायतींमार्फत जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते मात्र सदर निवेदनाची दखल घेऊन चौकशी साठी आलेल्या अधिकाऱ्यांकडून मात्र तक्रारदारांची चौकशी होत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त करून सदर अधिकारीलाच तक्रारींचे निवेदन दिले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, होळनांथे येथील एसबीआय बँके बँक शाखेत ग्राहकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे यात पासबुक प्रिंटिंग असून ते कर्ज प्रकरणात पर्यंत अनेक अडचणी ग्राहकांना येत आहेत त्यातच अधिकाऱ्यांची अरेरावीला कंटाळून येथील खातेदार शेतकरी व्यापारी व बेरोजगारांच्या विविध अडचणी संदर्भात परिसरातील ग्रामपंचायतींमार्फत जिल्हाधिकारी शोधू डे तहसीलदार शिरपूर यांच्यासह संबंधित विभागांना निवेदन देऊन बँकेतील अधिकारीना समज देऊन बँकेच्या व्यवहार सुरळीत ठेवण्यास संदर्भ निवेदन देण्यात आले होते. सदर निवेदनाची दखल घेऊन नंदुरबार येथील चीप मॅनेजर राजेश मिश्रा हे चौकशीसाठी आले होते. मात्र यावेळी तक्रारदारांना फोन करून बँकेत बोलून बँकेत तुम्ही बँकेचे लोन घेतले आहे का तुम्ही कोणाला कर्ज प्रकरणात जामीन आहात का बँकेतील बँकेत तुमची कर्ज प्रकरणाची फाइल आहे
का अशा पद्धतीची विचारणा करण्यात आली. अधिकाऱ्यांकडून तक्रारदारांची उलट चौकशी होत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. परंतु सर्वच तक्रारदारांची चौकशी सुरू झाल्याने बँकेत उपस्थित तक्रारदारांनी पुन्हा चौकशीसाठी आलेल्या चीप मॅनेजर राजेश मिश्रा यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
(पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी)
बँकेच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्या संदर्भ निवेदनाची दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी बँकेत आले असून ते तक्रारदारांचीच चौकशी करीत असल्याने तक्रारदारांनी पत्रकारांना कळवले असता प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी बँकेत दाखल झाले यावेळी त्यांनी बँकेचे फोटो व व्हिडीओ शूट करत तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेतले तद्नंतर अधिकार्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता राजेश मिश्रा नामक अधिकाऱ्यांनी पत्रकारांना धमकी देत सांगितले की, बँकेत फोटो काढायची परवानगी नसून तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगून त्यांनी केबिनमध्ये काढता पाय घेतला.
(मनोगत)
माझ्या आईच्या नावाचे पिक कर्ज मी मागील मार्च महिन्यात भरलेले असून त्या खात्यावरील कर्ज नीलचा दाखला अद्याप मिळालेला नाही. सातबारावरील बोजा पैसे भरूनही कमी झाला नसल्याने मला पुढील व्यवहारास अडचणी येत आहेत
गणेश पाटील, शेतकरी, घोडसगाव
बँकेत कर्ज प्रकरणासह बँक व्यवहारात बऱ्याच अडचणी येत असून येथील अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात तरी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,ही विनंती.
वासुदेव राजपूत, माजीसरपंच, नांथे
बँकेत सर्वर डाऊन पासून ते कर्ज प्रकरणाबाबत ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.ग्राहकांनी अधिकारिंना आपल्या अडचणी संदर्भ विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
गिरिष जैन, व्यापारी,
होळ, ता. शिरपूर
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा