Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
राज्य उत्पादन शुल्क धुळे नंदूरबार नाशिक विभागाचा अजब हिशोष ! उपलब्ध ताडी झांडापेक्षा दुकानांची संख्या जास्त !
राज्य उत्पादन शुल्क धुळे नंदूरबार नाशिक विभागाचा अजब हिशोष ! उपलब्ध ताडी झांडापेक्षा दुकानांची संख्या जास्त !
तरुण गर्जना वृत्तपत्र: चालू महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग धुळे यांनी जिल्ह्यातील एकूण १८ ताडी दुकानांचे लिलाव केलेले आहेत.प्रत्यक्ष तालुक्यात व शहरा साठी दुकानासाठी परिसरात शुध्द ताडीसाठी आवश्यक इतकी शिंदी व ताड माड ही झाडे अपलब्ध नसतांना दुकाना चालवन्याची परवानगी कशी ? प्राप्त माहिती नुसार शहरात व ग्रामीण भागासाठी एका दुकानासाठी ५०० झाडे तर शहरी भागातील दुकानासाठी १००० झाडे आवश्यक आहेत.असे असतांना राज्य उत्पादक शुल्क विभागाने कोणत्या नियमाने शहर व ग्रामीण भागासाठी दुकानांचा लिलाव केलेला आहे.
याचा उलगडा होत नाही व नियमात बसत नाही मग दुकानदार आपल्या लिलावाची रक्कम व नफा कमविण्यासाठी कुठलाही विचार न करता मानवी शरीरास अतिशय घातक अशी रासायनीक पदार्थ क्लोरल हायड्रेट मिश्रीत ताडी विक्री करून आपले दुकान चालवणार का ? यापुर्वी ताडी विक्री लिलाव हे पुरेशी ताडीचे झाडे उपलब्ध आहेत अश्या व्यक्तीनांच ताडी विक्रीचे परवाने दिली जात होते.
मात्र यावेळेस झालेल्या लिलावातील देण्यात आलेले परवाने धारकांकडे ताडीचे झाडे नसतांना देखील कसे काय परवाने दिलीत ? ही बाब खुपच धक्कादायक आहे. इतकेच नव्हे तर ज्यांना परवाने देण्यात आलीत त्यांच्याकडे टी.डी.-१ परवान्यासाठी आवश्यक त्या अटी शर्ती नुसार जागा देखील उपलब्ध नसल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.
खरे पहाता ताडी दुकान परवान्यासाठी लिलाव बोलीपुर्वीच प्रस्तापित दुकानासाठीची चतु:सिमा नमुद करावी लागते.सदर अनुज्ञप्ती मध्ये त्याच्याकडे उपलब्ध झाडांची माहिती देणे व त्यांचा ७/१२ उतारा देणे आवश्यक असून त्याबाबतची प्रयोगात्मक तपासणी विभागामार्फत करु घेण्यात येते. तालुक्यातील ताडी विक्री दुकानासाठी पुरेशी असे कोणती झाडांची प्रयोगात्मक तपासणी विभागामार्फत करुण घेण्यात आलेली दिसुन येत नाही.
धुळे नंदूरबार नाशिक जिल्ह्यातील ताडीचे झाडे आहेत तरी कीती जेथे झाडे आहेत ते परिपक्क नाहीत परिपक्वता असलेल्या झाडांकडून वर्षाकाठी एकशे सत्तर लिटर ताडी मिळणे आवश्यक आहे या प्रमाणे पाहिल्यास अतिशय कमी प्रमाणात ताडी उपलब्ध होणार आहे अशी परिस्थिती असतांना शहरात व ग्रामीण भागात किती शासन मान्य ताडी विक्री दुकाने सुरू करणार हा प्रश्न जनते समोर येत आहे
मानवी जिवनाशी खेळला जाणारा खेळ कधी थांबणार अशी चर्चा परिसरात सुरु झालेली आहे.याकडे राज्य उत्पादक शुल्क विभागाने लक्ष द्यावे.अशा अपेक्षा जनतेकडून होत आहे.(सविस्तर वाचा पुढील अंकात)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उपसंपादक :- माधव खाबिया सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत सायंकाळच्या सुमारास पायी चालणारे महीलांचे गळयातील सोनसाखळ...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
मालेगाव तालुक्यातील पांढरूण येथे बोगस ताडी दुकान चालू असुन दारु उत्पादक शुल्क मालेगाव व नाशिक यांच्या कडे वेळोवेळी तक्रार अर्ज करुन सुध्दा दारु उत्पादक शुल्क प्रशासना कडुन आज पर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
उत्तर द्याहटवापांढरूण ताडी दुकानाची माहिती अधिकार खाली माहिती मागितली असता दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी माहिती मिळाली नाही प्रथम अपिल केले असुन त्यावर सुध्दा अद्याप दखल घेण्यात आली नाही दारु उत्पादक शुल्क विभागा कडुन कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
⚫जाहीर निषेध⚫