Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
नाशिक,वणी येथे बसस्थानक परिसरात ४५ वर्षीय महिलेवर बुधवारी रात्री सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली असून वणी शहरासह जिल्ह्यात खळबळ
नाशिक,वणी येथे बसस्थानक परिसरात ४५ वर्षीय महिलेवर बुधवारी रात्री सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली असून वणी शहरासह जिल्ह्यात खळबळ
वणी प्रतिनिधी :याबाबत सविस्तर वृत्त असे कि,दि.२७ ऑक्टो. रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पीडीत महिला बस स्थानक परिसरात एका व्यक्तीशी बोलत होती, त्या दरम्यान या ठिकाणी दुचाकीवर काही तरुण आले व त्या ठिकाणाहून महिलेला जबरदस्ती करून घेऊन गेले त्यात दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.त्यानंतर त्यांच्यासोबत अजुन दोघे जण होते या सर्वानी तीला उचलुन नदीकडील परिसरात घेऊन गेले व पुन्हा दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना पिडीत महिलेसोबत बोलणाऱ्या व्यक्तीने वणी पोलीस ठाण्यात येऊन सांगीतली,त्यानुसार वणी पोलीसांनी तातडीने दखल घेत घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला.
वणी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.स्वप्निल राजपुत यांनी आपल्या कर्मचा-यांना सुचना देत तपासचक्र वेगवान केले. घटनास्थळी एक दुचाकी आढळून आली त्यासाठी पोलीस परिसरात दबा धरून बसले होते. काही वेळात दुचाकी घेण्यास आलेल्यां संशियत तरुणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी सर्वांची नावे सांगितले,पोलीसांनी विलंब न करता सर्व आरोपींना चार तासातच अटक केली.
यात सोमनाथ कैलास गायकवाड वय २३, संदिप अशोक पीठे, वय २४, राजेंद्र दिपक गांगोडे, वय २६, आकाश शंकर सिंग वय २४ सर्व राहणार इंदिरानगर वणी येथील असुन पोलीसांनी सदर आरोपींना अटक केली आहे. घटना पाहता फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावर तपासणी केली. परिस्थितीजन्य पुरावे यावेळी पोलीसांनी हस्तगत केले. आरोपी विरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा