Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

धुळे जिल्यातील कॉग्रेसचे युवा आमदार कुणाल पाटील यांचा कडून धुळे जिल्हा कारागृह याना रुग्णवाहिका चे लोकार्पण



ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धुळे जिल्हा कारागृहात स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी आचार्य विनोबा भावे,कर्मवीर दादासाहेब गायकवाड,जमनललाल बजाज, साने गुरुजी अशा अनेक महान विभूतींनी तुरुंगवास भोगला आहे. 

येथील बंदीवानांना दातांच्या उपचारासाठी बाहेर घेऊन जाण्याची गरज भासू नये म्हणून कारागृहात आमच्या जवाहर मेडिकल फाउंडेशन संचलित अण्णासाहेब चुडामन पाटील डेंटल कॉलेज आणि रोटरी क्लब धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणाऱ्या डेंटल क्लिनिकचे काल उदघाटन केले आणि तुरुंगातील विविध कक्षांना भेटी देत आचार्य विनोबा भावे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड,सानेगुरुजी यांना अभिवादन केले. रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष शेखर मेहता, डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ दोडामनी, कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

माझे आजोबा माजी खासदार, स्वातंत्र्यसेनानी अण्णासाहेब चुडामन पाटील यांना १९४२ च्या चाले जाव आंदोलनात २ वर्षाची शिक्षा झाली होती, नाशिक कारागृहात नेण्यापूर्वी ते ज्या कारागृहात होते त्याच कारागृहात त्यांच्या नावाने सुरु असलेल्या डेंटल कॉलेजने दंत आरोग्य केंद्र सुरु केले याचा मनस्वी आनंद झाला.सामाजिक जाणिवेतून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाचा कारागृहातील बंदिवान, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फायदा होईल याची खात्री आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र  सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध