Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१
दहीवेल,साक्री तलाठी वाजे,यांना स्वताच्या फायद्यासाठी अडवणूक भोवली
धुळे प्रतिनिधी : तक्रारदार शेतकरी यांची मौजे दहिवेल तालुका साक्री धुळे येथील जमीन गट नंबर १८१/२/इ अशी शेतजमीन क्षेत्रापैकी सहाशे चौरस मीटर क्षेत्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवी दिल्ली यांनी नागपूर सुरत महामार्गासाठी संपादित केली होती. त्या संपादित जमिनीचा गट नंबर १८१/२/इ/बं क्षेत्र सहासे मी.असा स्वतंत्र सातबारा उतारा प्राधिकरणाचे नावे झालेला आहे.त्या संपादनाची बिल वडील हयात असताना मिळाले होते.
परंतु सदर चे बिल मान्य नसल्याने कोर्टात अपील दाखल करण्यासाठी वकिलांनी वडिलांच्या मृत्यूपश्चात वारस चौकशी अहवाल व शेत जमिनीचा सातबारा उतारा आणावा असे सांगितले तक्रारदार शेतकऱ्यांनी कोट कामासाठी लागत असलेले दहिवेल तलाठी तानाजी वाजे यांना वारस चौकशी अहवाल, सातबारा उतारा मागणी केली.
असता, त्यांच्याकडे तलाठी दहिवेल यांनी सात हजार रुपये मागणी केली, आपली अडवणूक होत असल्याचे लक्षात येताच जमीनधारक शेतकरी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांना संपर्क साधत तक्रार दिली, त्यानुसार कारवाई करत दिनांक २८/१०/२०२१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे,तलाठी तानाजी वाजे याला सात हजार रुपये मागणी पैकी तीन हजार रुपये पंचा समोर स्वीकारताच पकडले,आपल्या पदाचा दुरुपयोग करत स्वतःच्या फायद्यासाठी अडवणूक करणारे तलाठी तानाजी धोंडीबा वाजे दहिवेल,
तालुका साक्री,धुळे,याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा नोंदवला असून,सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक सतीश भामरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे,पोलीस निरीक्षक मनजिसिंग चव्हाण,पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, यांच्यासह पथकाने केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा