Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१
आता धुळे माध्यमिक शिक्षण विभागावर सिसिटीव्ही ची करडी नजर
धुळे प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणारा अतिशय महत्त्वपूर्ण व पवित्र असा विभाग जर असेल तर तो म्हणजे शिक्षण विभाग.आता हेच धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय हे पूर्वीचे कधीतरी नावलौकिक झाले होते. तेच कार्यालय त्यानंतरच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात गाजले ते म्हणजे येथील भ्रष्ट शिक्षण अधिकारी लाचलुचपत प्रतिबंध कायद्यात अडकल्यामुळे. त्यानंतर बोगस मान्यता मध्ये या कार्यालयाची तर सीमाच ओलांडली होती.
ज्यामुळे धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय व त्या कार्यालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः कलंकित झाला होता.याच माध्यमिक शिक्षण विभागात धुळे जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून कुणीही कायम शिक्षणाधिकारी येथे चार्ज घेण्यासाठी पुढे येत नव्हते.अनेक वर्ष प्रभारी शिक्षणाधिकारी यांनी काम पाहिले.मात्र हा बरबटलेला विभागात आपण कायम स्वरूपी शिक्षण अधिकारी म्हणून चार्ज स्वीकारल्याचे चॅलेंज घेतले पाहिजे.असे व्यक्तिमत्व तयार झाले ते म्हणजे धुळे जिल्ह्यातील आपल्याच मातीतील व पूर्वी येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून अनुभव असलेले कर्तव्य दक्ष अधिकारी मोहन देसले यांनी येथे काही महिन्यांपूर्वी शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे म्हणून रुजू झाले. मात्र या कार्यालयात पूर्वीच्या चुकीच्या सवयी लागलेल्या सावरणे फार कठीण आहे.
तिथे काम करणे तारेवरची कसरत आहे. हे त्यांना चांगलेच माहिती होते. ते जेव्हा या विभागाचे अधिकारी म्हणून बसले. तेव्हा अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. माध्यमिक शिक्षण विभागाचे वाहन खराब होऊन पडले होते.म्हणून स्वतःची खाजगी गाडी वापरून या अधिकाऱ्यांनी आपले कामकाज प्रथम सुरू केले.
त्यानंतर थकित वीज बिलामुळे येथील विद्युत प्रवाह खंडित करण्याचा प्रसंग आला. त्यामुळे इंटरनेट सेवा खंडित झाली. कार्यालयातील ऑनलाइन सर्व कामे ठप्प झाली. तो प्रश्न सोडवण्यासाठी जीकरीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. तोही प्रश्न त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने मार्गी लावला. बिघडलेले वाहन दुरुस्ती करून तेदेखील आता शासकीय वाहन उपयोगात आणल्या सारखे दुरुस्त केले. गेल्या नऊ वर्षांपासून येथील सेवानिवृत्त झालेले शिक्षण अधिकारी यांना अद्याप पेन्शन देखील मंजूर झालेले नव्हते ती स्पेशल केस म्हणून त्यांनी आज रोजी त्यांचेही पेन्शन बसवून देण्याचा मान मिळवला.आणि या कार्यालयाला एक चांगली शिस्त लागावी. बाहेरील इतर काही चुकीची कामे घेऊन येणाऱ्या शक्तींचा या कार्यालया मधील वावर थांबवण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद धुळे येथून सिओ यांचे कडुन कार्यालयासाठी सीसीटीव्ही मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दाखल करून तो देखील मंजूर करून घेतला. आणि आता आपल्या प्रत्येक विभागातील अपडेट ते या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपल्या केबिन मधूनच नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग करू लागले आहेत.
म्हणून खऱ्या अर्थाने या ध्येय वेड्या अधिकारी ने आपले माध्यमिक शिक्षण विभाग खऱ्या अर्थाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरे खाली आणून या कार्यालयात विनाकारण चुकीची कामे करणाऱ्यांवर लगाम लावण्याचा एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. एखाद्या अधिकाऱ्याच्या काम करण्याच्या पद्धतीने असा चांगला बदल बदनाम झालेले कार्यालय देखील सहज कात टाकण्याचा प्रकार करू शकतो हे जिवंत उदाहरण धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून लाभलेले कर्तव्यदक्ष शिक्षण अधिकारी मोहन देसले यांना हे सर्व श्रेय जाते. अनेक अडलेली शिक्षकांची कामे आता सहज होऊ लागल्याने शिक्षकांच्या मनात या कार्यालया विषयी पुन्हा पूर्वीसारखा आदर्श निर्माण होण्यास मदत व्हायला लागली आहे.
या ठिकाणी आज दिनांक 29. ऑक्टोंबर 2021 रोजी नाशिक विभाग पदवीधर शिक्षक आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी भेट दिली असता. तेथे त्यांना हा सर्व बदल प्रत्यक्ष पाहायला मिळाला या कामातून त्यांना तेथे कामानिमित्त आलेल्या शिक्षकांनी सहज प्रतिक्रिया दिली की साहेबांनी हे कार्यालय अतिशय चांगले करून आम्हा शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन आम्हाला आनंद देत आहेत. आमचा प्रश्न आता कोणताही शिल्लक राहत नाही.
अनेक वर्षांपासून अनुकंप भरती प्रक्रियेतील अडकलेल्या मान्यता धूळ खात पडलेल्या होत्या त्यामुळे ज्या कुटुंबातील कर्मचारी दगावला होता त्या कुटुंबावर मोठा आघात झाला होता. मात्र अनुकंपा तत्त्वावर त्या कुटुंबातील प्रतिनिधींना नोकरी तर मिळाली मात्र मान्यता नसल्यामुळे त्यांचा वेतनाचा प्रश्न कायम राहिला. त्या मान्यता देखील देण्यासाठी सकारात्मक सुरुवात त्यांनी केलेली आहे.
अशी माहिती त्यांनी पदवीधर शिक्षक आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना दिली. विविध संघटनांना देखील या कार्यालयात त्यांचे रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षणाधिकारी मोहन देसले हे स्वतः सर्व प्रश्न व्यवस्थित समजून घेतात व जे नियमात बसत असतील ते प्रश्न तातडीने सोडून देण्याचा प्रत्यक्ष अनुभव शिक्षक संघटनांना देखील आलेला आहे.
एकंदरीत धुळे जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग आता डिजिटल माध्यमाच्या द्वारे व सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना तातडीने माहिती मिळेल अशी महत्त्वपूर्ण प्रत्येक माहिती स्वतः शिक्षणाधिकारी मोहन देसले हे अपडेट करत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव येत आहे. माध्यमिक शाळांचे पगार दर महिन्याला वीस ते पंचवीस तारखेपर्यंत होत होते ते पगार दर महिन्याला पाच तारखेच्या आत करण्यावर शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी शब्द दिला होता आणि तो गेल्या तीन महिन्यापासून खरा देखील केलेला आहे. मुख्याध्यापक यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे यासाठी सोशल मीडियाचा वापर करून माध्यमिक शिक्षण विभाग अपडेट देत आहे. म्हणून धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग आता एक शिस्तप्रिय विभाग म्हणून लवकरच नावारूपाला पुन्हा आलेला आहे. आज दिनांक.२९.१०.२०२१ रोजी एकूण आठ सीसीटीव्ही कॅमेरे या कार्यालयात बसविण्यात आले असून ते सुरळीत सुरू झालेले आहेत.
त्यांचे अपडेट वेळोवेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले हे आपल्या कार्यालयात घेत असून प्रत्येक टेबलवर नेमके काय काम सुरू आहे? याचा आढावा सीसीटीव्ही कॅमेरा तुन त्यांना आपल्या केबिनमध्ये बसून मिळत आहे. या सिसिटिव्ही कॅमेरां मुळे अनेक फायदे झालेले आहेत. चुकीची कामे घेऊन येणारा सहज या कॅमेरा मध्ये अडकू शकतो. आणि संबंधित टेबल वरील कर्मचारी यांना अरेरावीची भाषा करणाऱ्या काही बाहेरील शक्ती यांनादेखील चाप बसलेला आहे.
यातून शासकीय कर्मचारी सुरक्षित झालेले आहेत. हा मोठा बदल शिक्षण अधिकारी मोहन देसले यांनी घडवून आणून दाखवला. सीसीटीव्ही कॅमेरा नेमके कोण बसवतो??? ज्यांना पारदर्शक काम करायचे आहे. आपल्या विभागाचे नाव चांगले करायचे आहे. असाच प्रामाणिक अधिकारी हे मोठे धाडस करू शकतो. हे यातून दिसून येते. म्हणून माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय धुळे जिल्हा हे आता आदर्श शिक्षण विभागाचे कार्यालय म्हणून नावारूपाला येऊ लागले आहे.
असे अनेक शिक्षकांच्या तोंडून संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत असुन शिक्षणाधिकारी मोहन देसले यांचे कौतुक होत आहे.काही बाहेरील शक्ती जाणून बुजून अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तेव्हा सर्व शैक्षणिक संघटनांनी एकत्र येऊन त्यावर आळा घातला पाहिजे व चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहून शासकीय वरिष्ठ अधिकारी यांना अभिप्राय देण्यासाठी देखील पुढे यायला पाहिजे अशी देखील चर्चा सर्वसामान्य शिक्षकांमध्ये होत आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा