Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील उर्मदा शिवारात गांजा शेती उध्वस्त..! शिरपूर तालुका बनतोय गांजा शेतीचे माहेर घर
शिरपूर तालुक्यातील उर्मदा शिवारात गांजा शेती उध्वस्त..! शिरपूर तालुका बनतोय गांजा शेतीचे माहेर घर
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील उर्मदा शिवारातील शेतात अवैधरित्या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणार गांजा अदृश्य अमली पदार्थ झाडांची आर्थिक फायद्यासाठी लागवड केल्याचे आढळून आल्याने शिरपूर तालुका पोलिसांनी छापा टाकून ३ लाख.७० हजार.रुपये किमतीच्या १८५ किलोग्राम वजनाच्या गांजाची ५ ते.६ फुटांची झाडे जप्त करण्यात आली आहे त्यात एका इसमा विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यातील उर्मदा शिवारातील एका शेतात अवैधरित्या आर्थिक फायद्यासाठी मानवी मेंदूवर परिणाम करणारा अदृष्य अमली पदार्थ गांजा झाडाची लागवड केल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली त्याआधारे दिनांक २९ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक पथक तयार करून उमर्दा शिवारात चुनीलाल गोटा पावरा राहणार उमर्दा तालुका शिरपूर हा खेडत असलेले शेतीवर कारवाई केली.
असता त्यात ५ ते ६ फूट उंचीचे गांजा झाडांची अवैधरित्या आर्थिक फायद्यासाठी लागवड केलेली आढळून आली त्या झाडांना मुळासकट उपटून जप्त करण्यात आली त्यांची मोजमाप केले असता ३ लाख ७० हजार.रुपये किमतीची १८५ किलोग्राम वजनाची झाडे मिळून आली जमीन खेडत असलेला आरोपी चुनीलाल गोटा पावरा रा उर्मदा ता शिरपूर याच्याविरुद्ध पोहेकाँ राजेंद्र मांडगे यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट सन.१९८५ चे.कलम २० व.२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ उपनिरीक्षक भिकाजी पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवळी पोहेकाँ राजेंद्र मांडगे पोहेकाँ संजय.धनगर पोहेकाँ माळी पोना चौधरी पोकाँ पावरा पोकाँ योगेश मोरे पोहेकाँ सईद शेख .पोना मनोज.पाटील यांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा