Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

गोपाल तायडे यांच्या आंदोलनाच्या ईशाऱ्याने न.प प्रशासन हादरले म्हाडा कॉलनीतील 28 चेंबर मधील मलबा काढण्याच्या कामाला गती



शेगांव :प्रतिनिधी (उमेश राजगुरे)
डॉ.अण्णा भाऊ साठे नगर म्हाडा कॉलनी मधील 28 चेंबर साफ करण्यात यावे करिता स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी वेळोवेळी नगर परिषद शेगाव ला संपर्क केला नगर परिषदे कडून चेंबर साफ करण्याचे काम जीवन प्रादीकरन 
विभागाचे असून हे काम त्यांनी करावे असे सांगण्यात आले. त्या मुळे गोपाल तायडे यांनी जीवन प्रदीकर विभाग खामगाव  यांच्याशी संपर्क साधला असता.त्यांनी हे काम स्थानिक नगर परिषद चे आहे.



असे म्हटले व हे काम जीवन प्रादिकारण  चे नसल्याचे रीतसर पत्र दिले. संतत्पत होऊन ते पत्र घेऊन  गोपाल तायडे नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांशी फोन द्वारे संपर्क करून हे काम आपल्या नगर परिषद विभगाचे आहे.व हे काम आपल्या कडील नसेल तर जीवन प्रदिकर विभागाने ज्या प्रमाणे पत्र दिले त्या प्रकारे आपण ही पत्र द्यावे.हे दोन्ही विभागाचे लेखी पत्र  घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आंदोलन करू हे काम कोणत्या विभागाचे आहे. 

हे जिल्हाअधिकाऱ्यांना विचारणार असे  ठणकावल्या नंतर म्हाडा कॉलनीतील 28 चेबर चे काम येत्या आठच दिवसात पूर्ण करून देणार असे नगर परीषद विभागा कडून सांगण्यात आले. गोपाल तायडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रलबित विषय मार्गी लावला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध