Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतिने दिवाळी व भाऊबीज निमित्त 300 निराधार व गरजू महिलांना साड़ी चा आहेर व फरसाण वाटप..
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतिने दिवाळी व भाऊबीज निमित्त 300 निराधार व गरजू महिलांना साड़ी चा आहेर व फरसाण वाटप..
शिरपूर प्रतिनिधी : सविस्कर वृत्त असे की, दिनांक 8/11/2021 वार सोमवार रोजी करवंद नाका येथे जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतिने व काही दानशूर मंडळी च्या अप्रतिम आर्थिक स्वरुपाच्या सहकार्याने तालुक्याचे तहसीलदार आबा महाजन,पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख, माझी.उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,
माझी.जिल्हा.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटिल,
शिक्षण मंडळ डायरेक्टर सुरेश सिताराम चौधरी,सुनील सोनवणे सरपंच मांडळ,राजेंद्र पाटिल सरपंच अजंदे,आनंदसिंग राऊळ संचालक सुतगिरणी,भीमसिंग राजपुत माझी.सरपंच लौकी,राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त भिखारी पवार,रावसाहेब भालचंद्र वाघ,
रावसाहेब पद्माकर शिरसाठ,दिसान टेक्सटाइल पार्क चे ए.जी.एम.शरद फुलपगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते दिवाळी व भाऊबीज निमित्त 300 निराधार व गरजू महिलांना साड़ी चा आहेर व फरसाण वाटप करण्यात आले.
त्या वेळी तहसीलदार आबा महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे सेवाभावी कार्य खुपच पारदर्शी आहेत त्या मुळे या पुढे देखील गौरगरीबांच्या सेवेसाठी प्रशाशनाच्या वतिने विकास सेन यांना योग्य ती सर्व मदत केली जाईल व मा.उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मागील 4 वर्षापासून प्रतिष्ठान चे सेवाभावी कार्य आम्ही बघत आहोत प्रतिष्ठान चे सर्वच सेवाभावी कार्य अतिशय कौतुकास्पद असतात त्या मुळे प्रतिष्ठान च्या या पुढील सर्वच सेवाभावी कार्यक्रमाला माझे स्वतः चे शकुंतलाई लॉन्स निशुल्क उपलब्ध करून देईल अशे आश्वाशन देण्यात आले
कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी मनोहर पाटिल सर यशवंत निकवाडे सर व संदीप चौधरी सर यांचे अप्रतिम सहकार्य लाभले
कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन,उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी,सचिव हेमलता येशी,खजिनदार कुलदीप राजपूत,विश्वस्त चंद्रकांत बाविस्कर यांनी केले होते.
कार्यक्रम प्रसंगी विकास सेन यांनी सर्वच दानशूर मंडळी यांचे मनस्वी आभार मानले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा