Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

देवतारी त्याला कोण मारी…! कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व नपाच्या कर्मचाऱ्यांमुळे खडयात पडलेल्या मुलीला मिळाले जीवदान.




कोपरगांव प्रतिनिधी:नशीब बलवत्तर असेल तर मुत्युही दोन पावले मागे सरतो ही म्हण आपण ऐकली असेल असाच एक प्रकार कोपरगाव येथे घडला.सविस्तर माहिती अशी कि 9 नोव्हेंबरला रोजी 10.30 वा.
दरम्यान ईश्वरी संतोष गंगवने वय 4 वर्षे 6 महिने रा.मोहनिराजनगर,कोपरगाव ही मोहनिराजनगर,येथे खेळत असताना वॉल कंपाऊड करीता एक ते दीड फुट रुंद व दहा ते बारा फुट खोल असलेल्या पाईल(खड्या) मध्ये 10 ते 12 फुट खोलीवर अडकलेली असल्या बाबत कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे कर्तबगार पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना माहिती मिळताच हे सर्व पोलीस स्टाफसह घटना ठिकाणी जावुन कोपरगाव नगरपरीषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने 2 तास प्रर्यंत शिताफीने प्रयत्न करीतऑक्सिजन पुरवठा करून समांतर बारा फूट खोल करून सतर्कतेने ईश्वरी संतोष गंगवने हिला सुखरुप बाहेर काढुन तिलाएस.जे.एस हॉस्पीटल,कोपरगाव येथे ॲडमिट केले आहे.सद्या मुलीची प्रकृती ठीक असून उजव्या हातचे बोटं फ्रॅक्चर झाली असून उपचार सुरू आहेत सदर वेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार यांच्यासह तहसिलदार,कोपरगाव नगरपालिका चे,कर्मचारी, व इतर स्थानिक नागरीक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध