Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
स्वच्छ भारत अभियानात सहभागी होवून पर्यावराचे संरक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य - आ. काशिराम पावरा
स्वच्छ भारत अभियानात सहभागी होवून पर्यावराचे संरक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य - आ. काशिराम पावरा
शिरपूर(प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वा वर्धापन वर्ष आझादी का अमृत महोत्सव म्हणून देशात सर्वत्र साजरा होत असून केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सर्व ग्रामिण व नाग रिकांनी सक्रीय सहभागी होवून आपले गाव व परिसर प्लास्टीक मुक्त व कचरा मुक्त करुन वृक्षारोपन करुन पर्यावरणाचे संरक्षण करावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आ.का शिराम पावरा यांनी नागरिकांना केले.
धुळे जिल्हा नेहरू युवा केंद्र व प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेतर्फे शिरपूर तालुक्यातील खर्दे षु. ।। येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात आ.पावरा हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. खर्दे.बु. येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून मान्यवरांचे स्वागत करुन आ.पावरा व मान्यवरांच्या नेतृत्वाखाली आर.सी.पटेल माध्य.विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बँड पथक सह गावातून स्वच्छता व पर्यावरण विषयी जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली. यावेळी खर्दे येथील ग्रामस्थांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीचा समारोप आर.सी.पटेल माध्य.व उच्च माध्य मिक विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला.
याप्रसंगी सौ.सुजाता गुजर, सौ.मनिषा गुजर यांच्या सहकार्याने बचत गट सहयोग महिला ग्रामसंघ खर्दे यांनी उभारलेल्या गृहउद्योग निर्मित गृहपयोगी वस्तूंचे स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते श्रमदान करुन वृक्षारोपन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रास्ताविक आत्मनिर्भर भारत अभियानाचे उत्तर महाराष्ट्र महासचिव राजेश मारवाडी यांनी तर सुत्रसंचालन नेहरू युवा केंद्राचे समन्वयक गणेश चौधरी व जितेंद्र राठोड यांनी केले.धुळे जिल्हा नेहरू युवा केंद्राचे अधिकारी अशोककुमार मेघवाल यांनी केंद्रामार्फत राबविल्या जाणा-या विविध योजनांची माहिती दिली. व्यासपीठावर सरपंच सौ. कविता काशिनाथ पटेल, उपसरपंच नितीन पटेल,नेहरू युवा केंद्राचे नाना पाटील, रविंद्र गुजर,तंटामुक्तचे सुभाष गुजर, प्रकाश गुजर, ग्रामविकास अधिकारी एन.के.बैसाणे यांच्यासह आत्मनिर्भर योजनेचे जिल्हा पदाधिकारी सौ. कविता बाविस्कर, ज्योती भोजने, यशोदा धाकड, पुजा पवार भोलेश्वर पाटील, राजेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते.
आर.सी.पटेलचे प्राचार्य पी.आर.साळुके यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी.बी.धायवर,ए.जे.पाटील, डी.एम.पवार,अमोल सोनवणे,पी.एस. अटकाळे,बी.एस.बडगुजर, सुनिता सुर्यवंशी, मिना जाधव, सुनंदा निकम नेहरू युवा केंद्राचे प्रियंका पावरा,ललीत पाटील, अनिकेत बोरसे यांनी मोलाचे सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा