Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

तरुण गर्जना च्या दणका... अवघ्या तासभरात बल्ब खरेदी करण्यास निधी उपलब्ध - वा रे.. कलम, तेरा करिष्मा !



पुनमचंद मोरे वाघाडी प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावातील,वाल्मिक नगर परिसरातील वार्ड क्रमांक 4 येथील काही महिन्यापासून या गल्लीतली लाईट बंद असल्याचे वृत्त तरुण गर्जना या वृत्तपत्रातून प्रकाशित होताच,अवघ्या तास भरात ज्या ग्रामपंचायतीकडे 100 रुपयाचा बल्ब खरेदी करण्याइतपत फंड नव्हता. 

त्यांनी रात्रीच्या वेळेस अवघ्या एका तासाच्या आत निधी उपलब्ध करून बल्ब  बसवण्यात आला. तर आज दिवसभरामध्ये ठिक ठिकाणी बल्ब बसवण्यात आलेत.  हा एका लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचा उत्कृष्ट परिणाम व नमुना आहे.

ग्रामपंचायतीकडून ठीक ठिकाणी बसलेल्या बल्ब बाबतच्या झालेल्या कामकाजाबाबत आमच्या तरुण गर्जना वृत्तपत्राचे  वाघाडी ग्रामपंचायतील बऱ्याच नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध