Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१
भोई समाजाची महत्वाची चिंतन बैठक
पुणे;येथील शिक्षक भवनात रविवार दि ३१ऑक्टेा.२०२१रोजी मा.जिल्हाधिकारी गाेकुळ मवारे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.बैठकीला राज्य मागासवर्गीय आयोगाचे प़.अध्यक्ष माजी न्यायाधीश चन्द़लाल मेश्राम,अे.के.भोई,डॉ.मिलिंद भोई (पुणे),ऐड् श्रीकांत पाटील,श्री सुरजूसेश्री बावणे,सौ योगेश्वरीताई मवारे,पुणे येथील महिला मंडळ वधू वर परिचय मेळाव्याच्या अध्यक्षा सौ शोभाताई भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीला संबाेधित करतांना मेश्राम साहेबांनी राज्य घटनेतील विविध तरतुदी,पदोन्नतीतील प्रश्न त्यातील उकल, न्यायालयीन दाखले यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. इंजि.रामकृष्ण माेरे (नंदुरबार) यांनी जातिनिहाय जनगणना, जिल्हास्तरीय विद्यार्थी साठी वसतिगृह यांची निकड,दिलीप परसने(चिखली) यांनी इ दाते आयाेगातील शिफारसी,सी.एम.भोई (शिरपूर) यांनी सामाजिक कार्याची विशेषतः तसेच अध्यक्षीय भाषणात श्री मवारे साहेबांनी'तळागाळातून भोई समाजाची जनजागृतीचीअपेक्षा व्यक्त केली.
उपस्थितात नंदुरबार जिल्ह्यातील सुपडू खेडकर,तुकाराम लांबोळे, महेंद्र साठे, काशीनाथ खेडकर,मनोज तावडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील भाईदास भोई व गुलाब भोई,भोजराज ढोले,दिलीप ढोले,सुदाम मोरे,राधेश्याम सोनवणे व महाराष्ट्रातील अनेक भोई समाज बांधव यांचा समावेश होता.
सूत्रसंचालन युवराज लांबोळे यांनी तर अे. के.भोई यांनी आभार मानून राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.आयोजन अखिल भारतीय भाेई समाज सेवा संस्था कडून करण्यात आले होते.महाराष्ट्रातील अनेक भोई समाज बांधव यांचा समावेश होता.
सूत्रसंचालन युवराज लांबोळे यांनी तर अे. के.भोई यांनी आभार मानून राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.आयोजन अखिल भारतीय भाेई समाज सेवा संस्था कडून करण्यात आले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...


छान परंतु सर्वांना मेसेज केला असता तर आम्ही देखील आलो असतो. आम्ही पुण्यातच होतो.
उत्तर द्याहटवा