Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

आज दि.८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूरच्या वतीने राज्य परिवहन मंडळ शिरपूर आगार यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आले असून


महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब
ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष व धुळे
जिल्हा निरीक्षक विनयजी भोईटे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व धुळे जिल्हा अध्यक्ष श्री राकेश चौधरी यांच्या नेतृत्वात एसटी कर्मचाऱ्यांना या पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिला असून   एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होत
आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे ३० हून अधिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास  मुळे  एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे. 
आज एसटी कर्मचारी- कामगार जगला, तरच एसटी जगेल' हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे या पत्राद्वारे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक महिने वेतन होत नाही तसेच त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी घर भागवण्यासाठी वंचित असतात व अनेक वर्षापासून व राज्य सरकार विलीनीकरण यासाठी किती एसटी कर्मचाऱ्यांच्या जीव घेतील? किती आई बहीण यांच्या कुंकू पुसले जातील? या सरकारला तरी कधी जाग येईल? तरी सरकारने या एसटी कामगारांच्या विषयावर लक्ष दिले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही यावेळी उपस्थित
मनसे धुळे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, मनविसे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे, मनसे शहराध्यक्ष चेतन सिंह राजपूत, मनविसे शहर अध्यक्ष सोनू राजपूत, मनसे वाहतूक सेनेचे महेंद्रसिंग राजपूत, मनोज चव्हाण, पंकज मराठे, रामकृष्ण ठाकूर, अजय सोनवणे, निखिल सूर्यवंशी, बबन पवार, व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध