Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

एस.टी.कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला धुळे जिल्हा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा



अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रदीप पाटील (बाबा) खंडापूरकर यांच्या आदेशाने नाशिक विभाग व धुळे जिल्हा यांच्या वतीने एस.टी .कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला या आशयाचे निवेदन साक्री तालुका आगार प्रमुख यांना देण्यात आले. गेल्या कित्येक वर्षापासून एसटी कामगारांचे अतोनात हाल आहेत तुटपुंज्या पगारावर त्यांना आपल्या संसाराचा गाडा हकावा लागतो. खरेतर त्यांच्या केलेल्या मेहनतीच्या मानाने त्यांना खूप पगार कमी आहे.

परिवहन महामंडळास राज्य शासनात समाविष्ट करण्यात यावे ही त्यांची मागणी वास्तव आहे तसेच राज्य परिवहन कर्मचारी यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या सर्व बाबींची दखल घेण्यात यावी या कारणास्तव एस.टी .कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. 

या संपास व उपोषणास तसेच वेळ आल्यास रस्ता रोको आंदोलनात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती सदैव एसटी कर्मचारी यांच्यासोबत राहील असे जिल्हा अध्यक्ष श्री अनिल दादा देसले, विभागीय अध्यक्ष श्री प्रवीण दादा बोरसे, महिला विभागीय अध्यक्ष प्राजक्ता ताई देसले, परिवहन विभाग जिल्हा अध्यक्ष करुणाताई पाटील, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री नितीन दादा ठाकरे, जिल्हा अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी श्री जितेंद्र बच्छाव, साखरी तालुका अध्यक्ष श्री सचिन पाटील, साखरी तालुका अध्यक्ष दिव्यांग विभाग श्री जयेश बावा,तालुका अध्यक्ष ग्रामीण श्री कारभारी अहिरे,तालुका अध्यक्ष ग्रामीण श्री धर्मा लांडगे, साक्री तालुका संघटक श्री बापू ठाकरे, संघटक साक्री तालुका श्री चंद्रशेखर अहिरराव, अध्यक्ष काटवन परिसर श्री हिंमत ठाकरे, अपंग विभागाचे श्री राजेंद्र मुरलीधर देसले, अध्यक्ष माळमाथा परिसर श्री विवेक बोरसे, पंकज बोरसे आत्माराम गांगुर्डे योगेश नांद्रे विनायक नांद्रे यांनी जाहीर केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध