Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

ज्येष्ठ नागरिक संघाच्या कोणत्याही कामासाठी तत्पर उभे राहू अशी आजी-माजी पंचायत समिती सदस्य व शिवसेनेचे राजधर देवरे (माऊली) यांची ग्वाही.



म्हसदी येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सभागृहासाठी पंचायत समिती प्रशासन सदस्य व ग्रामपंचायत प्रशासन आणि धनदाई तरुण मंडळ विशेष सहकार्य करेल.अशी ग्वाही रविवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या इमारतीत झालेल्या मंडळाच्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठांना देण्यात आली.
ज्येष्ठ नागरिक मंडळाचे तज्ञ संचालक यादवराव देवरे अध्यक्षस्थानी होते. तसेच मंडळाचे अध्यक्ष नथ्यु भदाणे व पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी माजी सदस्य माऊली तथा ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, धनदाई तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे,उपाध्यक्ष के.एन.देवरे, ज्येष्ठ संचालक गंगाराम देवरे तर संचालक यादवराव देवरे ,निवृत्त शिक्षक एन.टी.बोरसे,देवेंद्र देवरे,रामदादा देवरे,संचालिका चंदनबाई देवरे,छगन मोहिते,रमेश देवरे,विजया देवरे,लालभाई पिंजारी,आनंदा भामरे,फकिरा खैरनार,उद्धव बागुल उपस्थित होते.
येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व्हावे,अशी जुनी मागणी आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वीच जागा दिली आहे.सभागृहासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती म्हसदी गणाच्या सदस्या प्रतिनिधी माऊली पाठबळ देणार आहेत.सभेत मृत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.इमारत बांधकाम निधीबाबत चर्चा झाली. ज्येष्ठांना मिळत असलेल्या सवलती, अल्प दरात आरोग्य शिबीर घेणे याविषयी मा.पचायत समिती सदस्य माऊली,राजेंद्र देवरे,सुभाष देवरे, गंगाराम देवरे,यादवराव देवरे आदींनी चर्चेत भाग घेतला.तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या कुठल्याही कामासाठी तत्पर उभा राहील अशी ग्वाही पंचायत समिती सदस्य यांचे प्रतिनिधी माजी पंचायत समिती सदस्य माऊली राजधर देसले यांनी दिली.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध