Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

भोई समाज सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने वधुवर परीचय मेळावा मिटींग संपन्न...!



फेब्रुवारी मध्ये भोई समाज सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने नूतन वर्षाचा पहिला वधु वर पालक परिचय मेळावा धुळे शहरात आयोजित करण्यासंबंधी रविवार दि. 28/11/2021 रोजी प्रदेशाध्यक्ष रोहितभाऊ शिंगाणे यांच्या ऑफिस मध्ये दुसरी मिटींग संपन्न झाली.या चर्चा सत्रात फेब्रुवारी महिन्यातील तारीख वधुवर परीचय मेळावा साठी निश्चित करण्यात आली आणि सोबतच मेळाव्या संबंधित इतर महत्त्वाचे मुद्दे सुध्दा चर्चेअंती ठरविण्यात आले.

या बैठकीला भोई समाज सेना चे संस्थापक अध्यक्ष मा.भिलेशभाऊ खेडकर,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.रोहितभाऊ शिंगाणे,राज्य उपाध्यक्ष मा.पुनमचंदभाऊ मोरे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. मनोहरभाऊ फुलपगारे,धुळे जिल्हाध्यक्ष मा.विरेंद्रभाऊ फुलपगारे, धुळे जिल्हा उपाध्यक्ष मा. ज्ञानेश्वरभाऊ जाधव,धुळे तालुका अध्यक्ष मा. योगेशभाऊ मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख संतोषभाऊ भोई,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाषभाऊ भोई,नागपूर विभाग अध्यक्ष राहुल गौर सर,धुळे जिल्हा कार्याध्यक्ष रोहिदासभाऊ ढोले, उमेशभाऊ वाडीले, मनोजभाऊ मोरे आदी पदाधिकारींसोबत फोनवर व गुगल मीट वर ऑनलाईन चर्चा करण्यात आली.

लवकरच फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या वधुवर परीचय मेळावा बाबत असलेले डिटेल्स प्रसिद्ध करण्यात येतील व सर्व समाजबांधवांना संपूर्ण माहिती देण्यात येईल. अंदाजे फेब्रुवारी महिन्यात रविवार 13 तारीख सध्या तात्पुरती निश्चित करण्यात आली असली तरी,निश्चित तारीख लवकरच कळविण्यात येईल,असे भोई समाज सेना तर्फे कळविण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध