Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

साक्री तालुक्यातील शेतकऱ्याने फिरवीला उभ्या कांदा पिकावर रोटाव्हीटर


अवकाळी पाऊस व वेळोवेळी येणारी कंडावरील रोगराई या दोन्ही गोष्टीतून साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा पिकावर अतोनात खर्च करून कांदा पीकविला ,पण पावसाळी कांद्याला खर्च करून देखील बाजारात मार्केट ला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा अतोनात रोटाव्हीटर फिरविला आहे . साक्री तालुक्यातील आमखेल गावात सुभाष नांद्रे या शेतकऱ्याने 1 एकर पावसाळी कांदा लावला होता पण मार्केट मध्ये पावसाळी कांद्याला भावाचं नाही त्या अनुषगाने शेतात उभ्या असलेल्या कांद्यावर त्यांनी रोटाव्हीटर फिरवीला आहे. मार्केट कांदा न्यायचं तर त्याला काढणी व कंपनीचा खर्च हा येत असतो पण मागील काही दिवस बऱ्याच मार्केट मध्ये पावसाळी कांद्याचा लिलाव होत नाही होता ,पण आता लिलाव होतो पण आलेला व्यापारी हा 2 ते 6 रु या दराने कांदा मागतो मग त्यात काढणी व वाहतूक चा देखील खर्च निघत नाही म्हणून शेतकऱ्याने शेतातच कांदा रोटाव्हीटर मारून पुढील येणाऱ्या पिकासाठी पिक शेत तयार करून घेत असेल. पण अद्यापाही शासनाकडून कुठलीही पाहणी शेतकऱ्यांच्या शेताची नाही झाली आहे . मदत मिळने ही तर दूरची बाब आहे . शेवटी हेच म्हणावे लागेल सगळे तुपाशी शेतकरी हताशि .

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध