Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचा शतकोत्तर दशकपूर्ती सोहळा आज आदरणीय पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.




या सोहळ्यास उपस्थित राहून सलग ११ दशके कार्यरत राहून सहकार क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल बँकेच्या सर्व संचालक मंडळाचे, अधिकारी, कर्मचारी, सभासद व ग्राहकांचे आभार व्यक्त केले व संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

या सोहळ्यास केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी, विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे, गृहमंत्री श्री. दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील, सहकारमंत्री श्री. बाळासाहेब पाटील, आरोग्यमंत्री श्री. राजेशभैय्या टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. अमित देशमुख, राज्यमंत्री विश्वजित कदम, सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, बँकेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध