Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

नामपूरला अलई विद्यालयात विविध उपक्रमांनी संविधान दिन संपन्न




उन्नती एज्युकेशन  
 संचलित अलई  माध्य विद्यालय नामपूर येथे  मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर  यांचे मार्गदर्शनाखाली 'माझे संविधान माझा अभिमान' या उपक्रमा अंतर्गत विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले।
      स्वातंत्राचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ,प्राथमिक,
माध्यमिक शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व,उद्दिष्ट्ये, समजावे या साठी दिनांक 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान माझे संविधान माझा अभिमान उपक्रम राबविण्यात आला।
या मध्ये विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी निबंध लेखन,पोस्टर,घोषवाक्ये,रांगोळी,वक्तृत्व स्पर्धा तसेच शिक्षकांसाठी माझे फलक लेखन सारखे उपक्रमाचे नियोजन करण्यात आले, सामुदायिक संविधान उद्देशिकेचे  वाचन, सोनजे यांनी  केले , विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून संविधाना बद्दल आदर व्यक्त करत देशाचे संविधान सर्वोच्च असल्याचे जाणून घेतले, व केलेले उपक्रम समाज माध्यमात पाठवले,या वेळी मुख्याध्यापक सौ स्नेहलता नेरकर  यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली , बहुसंख्य विद्यार्थ्यांनी 
भाषण केले,उपक्रम यशस्वी करण्यासाठी पाटील बागूल भदाणे मगर या शिक्षकांनी  विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व सर्वांनी  परिश्रम घेतलेत आहेत

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
शरद खैरनार नामपूर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध