Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

नामपूरला संविधान दिनानिमित्ताने आर्ट ऑफ लिव्हिंग कडून रक्तदान शिबिर संपन्न


येथील बसस्थानक परिसरात संविधान दिनाचे औचित्य साधत जाणीव ग्रुप, आर्ट ऑफ लिव्हिंग कडून रक्तदान शिबीर राबवून संविधान दिन साजरा करण्यात आला' यात तरुणांनी स्वच्छेने रक्तदान करून सहभाग घेतला. अनोख्या पद्धतीने संविधान दिन साजरा करून तरुणांना संविधानाचे वाचन व पूजन करण्यात आले.  
         संविधाना दिनानिमित्ताने शुक्रवार (दि२६) सकाळी १० वा बसस्थानक परिसरात उपस्थितांना  भारताचे संविधानाची प्रतिज्ञा देण्यात आली. यांनतर तरुणांना भारताचे संविदान किती श्रेष्ठ आणि मजबूत असल्याची माहीती  कैलास चौधरी यांनी दिली. उपस्थित तरुणांनी रक्तदान सारखे श्रेष्ठ दान करून संविदान दिनाला सलामी दिली. रक्तदानासाठी सेवा ब्लड बँकेला पाचारण करण्यात आले होते. रक्तपेढीकडून रक्तदात्याला प्रमाणपत्र  वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे,पो.कॉ.गुंजाळ,सामाजिक कार्यकर्ते समाधान देवरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन अहिरराव,चारुदत्त खैरनार,शरद खैरनार,किरण पवार,विनोद अहिरे,अनिल खरे,संजय अहिरे,दिगंबर सोनवणे, राकेश सोनवणे,चेतन सोनवणे,शशिकांत खैरनार,विठ्ठल मगजी,तोरवणे सर,तोरवणे,पोपट वाघ,ब्लु पँथर ग्रुप यावेळी उपस्थित होते. 

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
शरद खैरनार नामपूर प्रतिनिधी
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध