Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१
पाचोरा आगारातील चालक ठरला संपाचा पहिला बळी
राज्यभरात गेल्या १४ दिवसांपासून एस
टी. महामंडळाच्या सर्व कर्मचान्यांनी राज्य
| शासनाच्या विलीनीकरण करून घेण्यासाठी
संप पुकारला असून संप काळात पगार
नसल्याने हवालदिल झालेल्या नगरदेवळा
येथील ४६ वर्षीय दिलीप तुकाराम
महाजन यांचा सोमवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान
हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
त्यांच्यावर नगरदेवळा गावी सायंकाळी
अतिशय शोकाकुल वातावरणात
अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाचोरा आगरात संपाचा
पहिला बळी ठरला आहे.
नगरदेवळा ता. पाचोरा
येथील दिलीप तुकाराम महाजन
हे गेल्या वर्षापासून चालक म्हणून सेवेत होते. गेल्या १५ दिवसांपासून संप सुरू असल्याने व संप
काळात पगार मिळत नसल्याने महाजन
यांची परिस्थिती अतिशय हालाकीची
असल्याने संप काळात त्यांची आई
व पत्नी मोलमजुरी करून संसाराचा
रहाटगाडा ओढत होते. चालक दिलीप महाजन हे रविवारी दुपारी १२
वाजेपर्यंत पाचोरा आगारात संपात सामील झालेले होते.
त्यांची अचानक छाती दुखू
लागल्याने ते नगरदेवळा गावी जाऊन आजारासाठी पैसे
नसल्याने पत्नीस सोबत घेऊन त्यांचे नागद ता. कन्नड येथे सासुरवाडी
येथे गेले होते. तेथून चाळीसगाव येथील
खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
करण्यास गेले असता त्यांना धुळे येथील
रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात
आला.त्यानंतर धुळे येथील रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यू झाल्याने नगरदेवळा सह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
नंदुरबार जिल्हा आदिवासी असूनही केवळ तुटपुंजी ₹४५ लाखांची मदत; शासनाच्या निष्काळजीपणाचा शेतकऱ्यांमध्ये संताप तहाडी:- नंदुरबार जिल्हा हा महार...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा