Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

लोकनियुक्त सरपंच दहिवद तालुका अमळनेर सौ.सुषमाताई वासुदेव देसले पाटील "ग्राम रत्न"हा पुरस्कार सन्मानचिन्ह व सन्मानपत्र




अमळनेर प्रतिनिधी : सौ.सुषमाताई वासुदेव देसले पाटील लोकनियुक्त सरपंच दहिवद तालुका अमळनेर (जळगाव) यांना प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक यांच्या वतीने २३ नोव्हेंबर रोजी निफाड येथे मा.ना.
श्री.बच्चुभाऊकडू .राज्यमंत्री महिला व बालकल्याण व शालेय मंत्रालय म.राज्य मुंबई यांचे शुभहस्ते व श्री बाळासाहेब क्षीरसागर अध्यक्ष जिल्हा परिषद नाशिक ,श्रीअनिल चौधरी,श्री सागर निकाडे.श्री दिगंबर वडघुले.श्री.राहुल सोनवणे.निफाड यांचे प्रमुख प्रमुख उपस्थितीत "ग्राम रत्न"हा पुरस्कार सन्मानचिन्ह व सन्मानपत्र सह देण्यात आला. मेगा वृक्षरोपण,महिला सक्षमीकरण,समाज कार्य विधवा परित्यक्ता अश्या महिलांसाठी केलेले कार्य,कोरोना कालखंडात गावातविकास उपाय योजना राबवल्या आहेत या चांगल्या कार्याची दखल अनेक सामाजिक संस्था,पक्ष व फाउंडेशन यांनी घेतली आहे.

यापूर्वी देखील विविध फाउंडेशन ,संस्था यांच्या वतीने "आदर्श सरपंच" ,"नारी रत्न" "सेवा रत्न " "राजमाता जिजाऊ तसेच सावित्रीबाई फुले " "कोरोना युद्ध" यासारखे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत ,आज सुषमाताई याना प्राप्त झालेल्या "ग्राम रत्न" राज्यस्तरीय पुरस्कार मुळे त्याचे विविध स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध