Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१
अमळनेर तालुक्यातील आदर्श ग्रामसेवक कैलास रामभाऊ देसले निलंबित..!
अमळनेर प्रतिनिधी :अमळनेर तालुक्यातील ग्रामसेवक कैलास रामभाऊ देसले यांना ग्रामपंचायत देवगांव – देवळी येथे ग्रामपंचायत कामांत दिरंगाई व हलगर्जीपणा केल्याने शामकांत पाटील यांच्या तक्रारीने निलंबित करण्यात आले आहे.
कैलास रामभाऊ देसले ,ग्राम विकास अधिकारी,ग्रामपंचायत जानवे पंचायत समिती अमळनेर हे ग्रामपंचायत देवगाव-देवळी येथे कार्यरत असतांना सन २००३,२००४,२००५,२००९,२०१०,ते २०१४ या कालावधीत ग्रामपंचायत देवगाव-देवळी येथील मासिक सभा ,ग्रामसभा,कोरम पुर्ण नसतांना सभा तहकूब न करता इतिवृत्त नोंदवहीत लिहिणे ,मासिक सभेच्या इतिवृत्त नोंदवहीत सदस्यांच्या सह्या घेवून इतिवृत्त न लिहिणे , ग्रामसभांचे कोरम पूर्ण नसतांना सभा तहकूब न करता इतिवृत्त लिहिणे असे कामकाज केले आहे. ग्रामसभेत विविध योजनांच्या वार्षिक जमा खर्चास मंजूरी न घेणे अशी गंभिर अनियमितता केल्याचे आढळून आले आहे.यावरून त्यांनी ग्रामपंचायत कामकाजात दिरंगाई तसेच हलगर्जीपणा केला असल्याचे आदेशात म्हटले आहे .या सर्व प्रकरणावर गटविकास अधिकारी चौधरी यांना त्यांना पंचायत समिती अमळनेर सेवेतून निलंबित केले असून त्यांचे निलंबन मुख्यालय बाबत तसेच दोषारोप पत्र १ ते ४ भरून सादर करण्यात आला आहे.
ग्रामसेवक कैलास रामभाऊ देसले यांना देवगांव देवळी येथेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला असल्याने शासनाच्या कामकाजाबाबत देखील तक्रारदार शामकांत पाटील यांनी जिल्हा परिषद जळगांव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव व जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा