Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील वनावल येथील युवक घरातून बेपत्ता झालेल्या युवकाचा तापीनदी पाञात मृतदेह आढळून आला
शिरपूर तालुक्यातील वनावल येथील युवक घरातून बेपत्ता झालेल्या युवकाचा तापीनदी पाञात मृतदेह आढळून आला
शिरपूर प्रतिनिधी :- घरातून बेपत्ता झालेल्या युवकाचा तापीनदी पुलावरुन दि 4 रोजी रात्री तापी नदीत उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याने युवकाचा तापी नदीत शोध सुरु होता.आज दि 7 रोजी सकाळी त्या युवकाचा मृतदेह तापी नदीत आढळून आला आहे.
शिरपूर तालुक्यातील वनावल येथील युवक किरण नानाभाऊ शिरसाठ (कोळी) वय 18 याने गिधाडे तापी नदी पुलावरून दि 4 रोजी तापी नदी पात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.याबाबत दि 4 रात्री तापी नदीपुलावर नागरिकांनी गर्दी केली होती.तेव्हा पासून तापी नदी पात्रात त्याचा शोध सुरु होता.तापी पुलावर चपला व मोटरसायकल मिळुन आल्याने तापीत उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.
आज चौथ्या दिवशी दि 7 रोजी सकाळी त्याचा मृतदेह तापी नदीत आढळून आला आहे.मयत किरण शिरसाठ याने ऐन दिवाळी सणासुदीला तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या का केली असावी याबाबत अनेक तर्क वितरक लावण्यात येत आहे.त्याच्या आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा