Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील राजधाने चे मानले जाणाऱ्या धाडणे गावाचा विकासाची गंगा हरवली कोठे*
साक्री तालुक्यातील राजधाने चे मानले जाणाऱ्या धाडणे गावाचा विकासाची गंगा हरवली कोठे*
साक्री तालुक्यातील एकेकाली तालुक्याची राजधानी असलेल्या धाडणे गावात गेल्या तीन ते चार वर्षात ग्रामपंचायत पातळीवर कुठल्याही विकास कामे होतांना दिसत नाही आहेत राज्य शासनाचा 14 व्या वित्त आयोगातून मार्फत लाखो रुपये निधी आलेला असताना देखील गावात ठोस अशी कामे होताना दिसत नाहीत याचेच उदाहरण धाडणे ग्रामपंचायती मधील स्मशानभूमी व दशक्रियाविधी शेड येथे असलेले घाणीचे साम्राज्य व काटेरी झाडे झुडपे यांनी व्यापून गेले आह मात्र तरी देखील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन धाडणे सरपंच हे त्यावर उपाय योजना करीत नाहीत व लक्ष देत नाही गेल्या तीन वर्षापासून गावातील परिस्थिती खुपच विदारक आहे व विकास खुंटला असल्याचे चित्र दिसते आहे. गेल्या तीन वर्षात गावात कुठेही शासकीय स्तरावर कामे होताना दिसत नाहीत. मात्र लाखो रुपये निधी थेट राज्य शासनाकडून ग्रामपंचायतीकडे देण्यात येतो परंतु तो पैसा कुठे खर्च केला जातो असा सवाल गावकऱ्यांकडून विचारला जात आहे. गावात अनेक समस्या असताना देखील ग्रामपंचायत प्रशासन कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाही. गावातील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांचे देखील समाधान कारक उत्तर त्यांना मिळत नाही. सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने धाडणे ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचेही बोलले जाते आहे.भविष्यात हे समोर येईलच पण ग्रामपंचायत धाडणे प्रशासनाने गावातील समस्यांचे त्वरित निराकरण करावे अन्यथा धाडणे गावाची सामान्य जनता गट विकास अधिकारी साक्री यांच्याकडे दाद मागण्यासाठी जाईल अशीही चर्चा आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा