Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील बेहेड ते नामपुर या त्याची दुरुस्ती करण्यात यावी नाहीतर उपोषणाला बसू अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा इशारा
साक्री तालुक्यातील बेहेड ते नामपुर या त्याची दुरुस्ती करण्यात यावी नाहीतर उपोषणाला बसू अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा इशारा
साक्री तालुक्यातील बेहेड ते नामपुर रस्त्याची अत्यंत दयनीय दुरावस्था झाली असून सदर रस्ता दुरुस्ती करण्या बाबत चे निवेदन मा. सौ. वर्षा महेश घुगरी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात साक्री तालुक्यातील मौजे बेहेड ते नामपुर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या रस्त्यावर माध्यमिक शाळा असून सध्या सदर रस्त्यावरून शाळा सुरू असल्यास विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. तसेच सदर रस्त्यावरून शेतकरी बांधवांना देखील आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी त्याच रस्त्यावरून वापर करावे लागते. त्यामुळे शेतीची कामे करणे देखील मुश्किल इचे होत आहे. सदर रस्ता हा अत्यंत खराब अवस्थेत आहे त्यावरून पायी देखील चालता येत नाही. सदर रस्ता हा नामपुर व मालेगाव जाण्यासाठी महत्त्वाचा असून त्या रस्त्याची क्षमता ही 15 ते 20 टनाच्या आसपास असून सदर रस्त्यावरून बाळू भरलेले डंपर साधारणतः 35 ते 40 टन क्षमतेची रात्रंदिवस शेकडोंच्या संख्येने चोरटी वाहतूक करीत असल्या कारणाने सदर रस्त्याची खूप मोठी दुरावस्था झालेली आहे. सदर रस्त्याची अत्यंत तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष श्री. अनिल दादा देसले हे देहेड नामपुर रस्त्यावर उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी विभागीय अध्यक्ष प्रवीण दादा देसले, जिल्हाध्यक्ष आणि दादा देसले, अध्यक्ष आदिवासी सेल रवींद्र ठाकरे, तालुकाध्यक्ष आदिवासी सेल तुळशीराम जगताप, तालुका अध्यक्ष ग्रामीण धर्मा दादा लांडगे उपस्थित होते. निवेदनावर प्रवीण बोरसे, अनिल देसले, प्राजक्ता ताई देसले, पुनम ताई काकुस्ते, करुणाताई पाटील, रवींद्र ठाकरे, नितीन दादा ठाकरे सचिन दादा पाटील, जयेश बावा, चंद्रशेखर अहिरराव, कारभारी अहिरे, धर्मा दादा लांडगे, राजू पाटील यांच्या स्वाक्षऱ्या
करण्यात आलेल्या होत्या.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा