Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
लातूर जिल्हाधिकारी आणि लातूर जिल्हा माहिती अधिकारी यांनी पत्रकारांच्या संदर्भात अज्ञानातूत काढलेल्या आदेशाचा निषेध
लातूर जिल्हाधिकारी आणि लातूर जिल्हा माहिती अधिकारी यांनी पत्रकारांच्या संदर्भात अज्ञानातूत काढलेल्या आदेशाचा निषेध
मुळात केंद्र शासनाच्या Department of Information Technology (Digital Media) या विभागाने देशभरातील Digital News Portal, You Tube Channels and OTT platform यांना अधिकृत मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित मंत्रालयाने digital माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना - ते निकष पूर्ण करत असतील तर भविष्यात त्यांना जाहिरात देणे आणि PIB प्रमाणे Accredited पत्रकार म्हणून मान्यता देण्याचा In principle निर्णय घेतला आहे.
Digital media ला नियमावली असावी, योग्य ते निर्बंध असावे हे आमच्यासारख्या digital portal चालवणाऱ्या पत्रकारांची मागणी आहे, आणि त्यावर केंद्र सरकार पाऊले उचलत आहे.
मी वर नमूद केलेल्या विभागाकडे देशभरातील असंख्य digital माध्यमांनी आपली नावे आणि सविस्तर माहिती नोंद केली आहे.
आमच्यावर योग्य तो अंकुश असावा यासाठी या विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अध्यक्ष असलेल्या तीन स्वतंत्र समितीना मान्यता दिली आहे आणि त्या समितीकडे डिजिटल पोर्टल ने सदस्यत्व स्वीकारावे अशी शिफारस केली आहे.
ही समिती digital पोर्टल च्या विरोधात काही तक्रार आली आहे का याची छाननी करते. तसेच स्वयंघोषित पत्राद्वारे आम्हाला आमच्या विरोधात काही तक्रार नाही, हे दरमहा वरील विभागाला 10 तारखेच्या आधी कळवणे बंधनकारक आहे.
ही माहिती लातूर जिल्हाधिकारी आणि त्यांना योग्य ती माहिती देण्याची जबाबदारी असलेल्या लातूर जिल्हा माहिती अधिकारी यांना नसणे, याचा खेद वाटतो.
जिल्हाधि महोदय, PIB किंवा RNI कडे digital माध्यमाची नोंद होत नाही, याचीही आपल्याला कल्पना नाही.
आपण, आपले आदेश मागे न घेतल्यास राज्यभर आपल्याविरुद्ध digital पत्रकारांमध्ये जनजागृती केली जाईल आणि राज्यभरातून आपल्याकडे निषेध पत्र पाठवले जाईल, याची दखल घ्यावी.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा