Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१
राज्यभरातील १६ विभाग,४५ आगारामधील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
राज्यात ३७६ एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन?
मुंबई (प्रतिनिधी )आता राज्य सरकारने देखील कडक भूमिका घेत,राज्यभरातील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे.यात अमळनेर आगारातील ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या व प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन थांबावे,असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे.मात्र, एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम आहेत. एसटी वाहतुक ठप्प असून,सणासुदीच्या काळात सामान्यांना याचा फटका बसला आहे.
राज्यभरातील १६ विभाग,४५ आगारामधील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.नाशिक विभागातील कळवण आगारातील १७,वर्धा विभागातील वर्धा आणि हिंगणघाट आगारामधील ४०, गडचिरोली विभागातील अहेरी, ब्रह्मपुरी, गडचिरोली आगारातील १४,चंद्रपुर विभागातील चंद्रपुर, राजुरा, विकाशा आगारातील १४,लातुर विभागातील औसा, उदगीर, निलंगा,अहमपुर,लातुर आगारातील ३१,नांदेड विभागामधील किनवट,भोकर, माहुर,कंधार,नांदेड,हादगाव,मुखेड, बिलोली, देगलुर आगारातील ५८,भंडारा विभागामधील तुमसर,तिरोडी,गोंदिया आगारामधील ३० सोलापुर विभागातील अक्कलकोट आगारामधील २,यवतमाळ विभागातील पांढरकवडा,राळेगाव, यवतमाळ आगारातील ५७,औरंगाबाद विभागातील औरंगाबाद-१आगारातील पाच, परभणी विभागातील हिंगाली व गंगाखेड आगारातील१०,जालना विभागातील जाफ्राबाद व अंबड आगारातील १६ , नागपूर विभागामधील गणेपेठ,घाटरोड, इमामवाडा,वर्धमान नगर आगारातील १८ , जळगाव विभागातील अंमळनेर आगारातील चार,धुळे विभागातील धुळे आगारातील दोन,सांगली विभागातील जत, पलुस,इस्लामपुर,आटपाडी आगारातील ५८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा