Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

माजी सैनिकाच्या खुनाची चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा द्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची मागाणी



अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रदीप पाटील (बाबा) खंडापूरकर यांच्या आदेशाने साक्री येथे मा.पोलीस निरीक्षक व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग साक्री यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनात मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा, हलखेडा जंगलात मृत प्रल्हाद शिवराम पाटील (वय ५२, रा, सावर्डे ता. कागल जी. कोल्हापूर) हे माजी सैनिकाचे नाव असून ते गावातील मित्र अनिल आनंदा निकम यांच्यासोबत कारणे शेगाव दर्शनासाठी ५ नोव्हेंबर रोजी निघाले होते. 

दरम्यान प्रल्हाद पाटील हे माजी सैनिक असल्यामुळे त्यांच्या परिचयाचे व्यक्ती हलखेडा येथे राहत असल्याने त्यांना भेटून पुढे शेगाव दर्शनाला जाण्याचा बेत होता. रात्री ९ वाजता प्रल्हाद पाटील यांनी एका मित्राला फोन करून बोलावले. त्यावेळी एक जण त्यांना घेण्यासाठी दुचाकी घेऊन आला. दुचाकीवर प्रल्हाद पाटील आणि अनिल निकम हे बसून मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा गावाजवळील ३किलोमीटर अंतरावर असलेल्या वढोदा ते हलखेडा जंगलातून जात असताना त्या ठिकाणी अगोदरच ६ ते ७ अज्ञात व्यक्ती उपस्थित होते यावेळी प्रल्हाद पाटील आणि पवार आडनाव असलेल्या तरुणाचा पैशांवरून वाद झाले. नंतर प्रल्हाद पाटील यांनी पुतण्याच्या फोन पे वरून ५५ हजार रुपये फोन पे वर टाकले. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेली काही रक्कम असे एकूण १ लाख ६ हजार ५०० रुपये दिले. पुन्हा पैशांच्या वादावरून हाणामारी झाली. दोघांना जखमी करून अज्ञात ६/७ व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाले. जखमी झालेले प्रल्हाद पाटील यांना उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. 

अनिल निकम यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याची सखोल चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष अनिल दादा देसले,विभागीय अध्यक्ष प्रवीण दादा बोरसे, विभागीय महिला अध्यक्ष प्राजक्ता ताई देसले,जिल्हा अध्यक्ष परिवहन विभाग करुणाताई पाटील,जिल्हा मुख्य कार्यकारी अध्यक्ष नितीन दादा ठाकरे, जिल्हा अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी जितेंद्र बच्छाव, तालुका अध्यक्ष सचिन पाटील, तालुका अध्यक्ष दिव्यांग विभाग जयेश बावा, तालुका अध्यक्ष ग्रामीण कारभारी अहिरे, तालुका अध्यक्ष ग्रामीण धर्मा दादा लांडगे, तालुका संघटक बापू ठाकरे,साक्री तालुका संघटक चंद्रशेखर अहिरराव, अध्यक्ष काटवान परिसर डॉ.हिंमत ठाकरे, अपंग विभागाचे श्री राजेंद्र मुरलीधर देसले, माळमाथा परिसर अध्यक्ष विवेक बोरसे, पंकज बोरसे,आत्माराम गांगुर्डे ,योगेश नांद्रे, विनायक नांद्रे,या पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आली.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध