Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
मुंबई,15 डिसेंबर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारची कोंडी..! सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासाठी डेटा तयार करण्याचे आदेश..!
मुंबई,15 डिसेंबर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारची कोंडी..! सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासाठी डेटा तयार करण्याचे आदेश..!
मुंबई,15 डिसेंबर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारची पुरती कोंडी झाली आहे.सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासाठी डेटा तयार करण्याचे आदेश दिले आहे.तर दुसरीकडे स्थानिक निवडणुका पुढ ढकलण्याबाबत राज्य सरकारने ठराव मांडला.पण,विनाआरक्षण अर्थात ओपन गटातून निवडणुका होणार आहे,याबद्दल निवडणूक आयोग लवकरच निर्णय जाहीर करणार आहे.
राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्यावर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली. पण आता निवडणुका या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच होणार आहे.विनाआरक्षण म्हणजे जनरल प्रवर्गातून होणार,असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.आज रात्रीपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत निवडणूक आयोगाला मिळताच या स्थगित निवडणुका घेतल्या जातील.नागरिकांचा
मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती पण आता निवडणुका होणार आहे.भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद 23 जागा,भंडारा व गोंदियातील 15 पंचायत समित्या 45,राज्यातील 106 नगरपंचायती- 344 आणि महानगरपालिका पोटनिवडणुका 1 होणार आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मागण्यात आला होता. पण सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे. याच मुद्यावर सन्मानिय मंत्र्यांनी आजच्या बैठकीत सूचना केल्या. मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी डेटा तयार होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
मंत्रिमंडळात पास झालेला ठराव निवडणूक आयोगाला पाठवला जाणार आहे.पूर्ण वेळ डेटा तयार करण्यासाठी भांगे नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.डेटा तयार करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम अधिवेशनाच्या ठरावानंतर दिली जाईल. आयोगाला प्राथमिक रक्कम देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूक घेऊ नये हा ठराव आज मांडण्यात आला, असंही भुजबळ यांनी सांगितलं.ओ बी सी आरक्षण शिवाय राज्यात कुठल्याही निवडणुका होऊ नयेत अशे मत राज्य सारकरकरचे आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा