Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

"चाकण मध्ये कॅप्सूल टँकरमधून गॅस चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक..



पुणे प्रतिनिधी: गणेश पाटील : पिंपरी 
(लोकशाही मराठी पत्रकार संघटना) पिंपरी चिंचवड येथे व्यवसायिक एक सिलेंडर मधून गॅस चोरीचे प्रकार समोर येत असताना थेट कॅप्सूल टँकरमधून गॅस चोरी होत असल्याचे उघडकीस आले.पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून तिघांना अटक.अटक केलेली आरोपींची नावे:नरसिंग दत्तू फड (वय 31)  2) अमोल गोविंद मुंडे (वय28) दोघेही राहणार बीड,राजू बबन चव्हाण (वय52) रा. रासे ता.खेड जिल्हा.पुणे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील रासे येते. कॅप्सूल टँकर मधून केस चोरी होत असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. कॅप्सूल टॅंकर मधून एलपीजी गॅस सिलेंडर मध्ये धोकादायक पणे घ्यायची चोरी करताना आरोपी समोर आले.

"वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई "
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकणे चौकात घरगुती वापराचा सिलेंडर मधून याची चोरी होत असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने मंगळवारी (दि.14) कारवाई केली. धनराज मालप्पा वाघे (वय 28) शुभम रघुनाथ गवळी (वय 27 दोघे राहणार रहाटणी) काकासाहेब साहेबराव मिसाळ (वय 28) सुरेश राजकुमार म्हत्रे वय 25, दोघेही रा. रहाटणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपीकडून पोलिसांनी 3 लाख 22 हजार 51 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध