Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण येथिल रॉयल्टी चुकवणाऱ्या वीट भट्टी मालकांना अडीच कोटीचा दंड ! धुळे जिल्हा प्रांत अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे आणि तहसीलदार सौ.गायत्री सैंदाणे यांची दमदार कामगिरी
धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण येथिल रॉयल्टी चुकवणाऱ्या वीट भट्टी मालकांना अडीच कोटीचा दंड ! धुळे जिल्हा प्रांत अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे आणि तहसीलदार सौ.गायत्री सैंदाणे यांची दमदार कामगिरी
तरुण गर्जना या वृत्तपत्रातून गौण खनिज माफियांबाबत व शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडविणाऱ्या भामट्यांबाबत पाठपुरावा सुरु असून मागील अंकातच आपल्याच पाळलेल्या पिल्लावळींचा कायमचा बंदोबस्त करण्याबाबत प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे वृत्त प्रकाशित केलेले होते.त्या वृत्ताची दखल घेत खरोखरच या भामट्यांचा सफाई व स्वच्छता मोहीमेची सुरुवात झाली असे म्हणण्यास हरकत नाही .
धुळे जिल्ह्यातील नवनिर्वाचित डॅशिंग प्रांत अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कुंडाणे (वार) येथे एका अवैद्य वीटभट्टीवर कारवाई करत चांगलाच दणका दिला आहे. गेल्याच महिन्यात त्यांनी या वीटभट्टीवर कारवाई करत तब्बल 44 60 ब्रास इतकी माती व गौण खनिज असा अवैद्य साठा पकडला होता. त्यानंतर सदर वीटभट्टी मालकाला नोटीस पाठवून खुलासा मागविला होता तथापि खुलाशात कोणतेही वैद्य पुरावे अथवा परवाने सादर न केल्यामुळे सदर अवैद्य गौण खनिज साठा केल्याप्रकरणी वीटभट्टी मालक कृष्णा मोरे राहणार (मोगलाई) धुळे यांना बाजार भावाच्या पाचपट म्हणजेच (दोन कोटी 48 लाख 83 हजार 2 रुपये) इतका दंड करण्यात आला आहे.
सदर वीटभट्टी मालक धुळ्यातील रहिवासी असून या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यातील वीट भट्टी चालक व वाळू माफिया यांचा मध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत 4600,40 ब्रास इतका अवैद्य गौण खनिज साठा व एक जे.सी.बी. आणि पोकलेन ही जप्त करण्यात आले आहे. वीट भट्टी वरील अशाप्रकारची जिल्ह्यातील ही पहिलीच सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. गेल्या महिन्यात धुळे जिल्ह्यातील कुंडाणे (वार) या शिवारा मध्ये खालील गट क्रमांक 7 मध्ये तलाठी व सर्कल यांनी विनापरवाना वीटभट्टी व्यवसाय सुरू असल्याच्या माहिती व तिचा अहवाल प्रांत अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना सादर केला होता. व त्यांनी याची गांभीर्याने दखल श्रीमती गोडमिसे यांनी आपल्या पथकासह मोठी कारवाई केली. या कारवाईत,या वीटभट्टी परिसरात अधिक पाहणी केली असता त्यात प्रचंड प्रमाणात माती साठवणूक केल्याचे दिसून आले.
व त्याच बरोबर वीस ते पंचवीस हजार कच्च्या विटा व मातीचे मोठे ढीग आढळून आले. त्यात सदर जागेचा पंचनामा तलाठी मार्फत करण्यात आला शिवाय या ठिकाणी धुळे ग्रामीण च्या तहसीलदार सौ.गायत्री सौंदाणे यांना पंचनामा करून अहवाल पाठवण्यात आला आहे.धुळे जिल्ह्यात नवीनच आलेल्या डॅशिंग प्रांताधिकारी यांचा हा कारवाईचा सपाटा जिल्हा भरात जोरात सुरू आहे.
परंतु धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा,
आणि साक्री येथे देखील मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गौण खनिज व वाळू वाहतूक केली जाते.तरी अशीच कारवाई इतर तालुक्यांमध्ये ही त्यांनी करणे अपेक्षित आहे. या निमित्ताने शासन कराची होणारी लूट थांबून या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या गुंडांना चांगलाच चपराक बसेल एवढेच...
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा