Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

रस्त्यांची तुलना हेमा मालिनीच्या गालांशी : पालकमंत्री गुलाबरावांच्या वक्तव्यावर उठली टिकेची झोड



मुंबई : जळगाव जिल्ह्यात निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांचा संदर्भ थेट हेमा मालिनी यांच्या गालांशी दिल्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टिकेची झोड उठली होती. महिलावर्गाचा हा अपमान असल्याची टिका झाल्यानंतर गुलाबरावांनी वक्तव्यावरून माफीदेखील मागितली. या वक्तव्यावर सिने अभिनेत्री हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दित अशा प्रकारचे वक्तव्य चुकीचे असल्याचे त्या म्हणाल्या शिवाय यापूर्वी अशा वक्तव्य करण्याची सुरूवात लालू प्रसाद यादव यांनी केल्याचे त्यांनी सांगत या वक्तव्यांकडे दुर्लक्ष आपण करीत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.पालकमंत्र्यांचा भाषणातून तोल घसरला बोदवड येथील जाहीर सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता टोला लगावला होहता.आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे गुळगुळीत असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

या टोल्याला उत्तर देताना काम केलं म्हणून जनतेने आपल्याला 30 वर्ष निवडून दिलं, असा पलटवार माजी मंत्री खडसेंनी केला होता मात्र, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळाले होते.

माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जावे रुपाली चाकणकर..!

गुलाबराव पाटील यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जा, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी गुलाबराव पाटलांना इशारा दिला होता तर ‘गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांचे गाल आणि रस्ते यांची तुलना केली आहे हे खरोखर चुकीचे विधान आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाईचे आदेश देतील की नाही ? हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नेहमीच त्यांच्या नेत्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आपापसात विसंवाद सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्कीच भाजपला पसंती देईल,असं ट्वीट करत प्रवीण दरेकर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

पालकमंत्र्यांनी मागितली माफी
वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटू लागताच गुलाबरावांनी आपल्या वक्तव्याने कुणाचे मन दुखावले गेल्यास माफी मागतो, असे देखील सांगितले होते. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध