Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा ऐतिहासिक महत्वपूर्ण निर्णय पुण्यात संभाजी महाराजांचा पुतळा उधारण्यास मंजुरी



उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा ऐतिहासिक महत्वपूर्ण निर्णय पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातील वढु बुद्रुक येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीबाबत बैठक पार पडली.छत्रपती संभाजी महाराजांचं साकारण्यात येणारं स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारं,त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं,भव्य दिव्य असलं पाहिजे. या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचं आयोजन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी,अशा सूचना केल्या. 

स्मारकाचं काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन, त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना संबंधित यंत्रांना दिल्या.
या क्षेत्रातील तज्ञ मंडळी तसंच सर्वसामान्यांकडून येणाऱ्या चांगल्या सुचनांचं स्वागत करुन त्याचा अंतर्भाव सुधारित आराखड्यात करण्यात यावा. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी, त्यावर नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी येणाऱ्या लाखो चाहत्यांची योग्य सोय व्हावी,याची काळजी घेण्यात यावी. समाधीचं पावित्र्य जपून परिसराच्या विकासाचं काम,सर्वांच्या संमतीनं आणि सर्वांना सोबत घेऊन भव्यदिव्य स्वरुपात करण्यात यावं. 

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध