Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना..! अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधींचे जिल्हा परिषदेचे समोर उद्या धरणे आंदोलन..!
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना..! अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधींचे जिल्हा परिषदेचे समोर उद्या धरणे आंदोलन..!
जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेकविध प्रलंबित मागण्यांसाठी दि.२३/१२/२०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता* जिल्हा परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद समोर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
सदर धरणे आंदोलनात अंगणवाडी केंद्रांच्या कामाचे ना दुरुस्त झालेले मोबाईल बदलून नवीन मोबाईल देण्यात यावे,पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात,मोबाईल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांवर लादण्यात येऊ नये, जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेटीची रक्कम तातडीने अदा करावी,माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या कामाचा मोबदला मिळावा, रद्द केलेली उन्हाळी सुट्टी देण्यात यावी,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहाराची थकीत रक्कम देण्यात यावी,अंगणवाडी सेविकांना रजिस्टर भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये,
सेवासमाप्ती लाभाची एक रकमी थकीत रक्कम अदा करण्यात यावी, अंगणवाडी सेविका मदतनीसांची रिक्त पदांची भरती करण्यात यावी,कोव्हिड-१९ मुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा रक्कम अदा करण्यात यावी, चाळीसगाव-२ प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जिओ टॅगच्या फोटोची सक्ती बंद करावी.
यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी धरणे आंदोलनात गणवेश परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन मिनाक्षी चौधरी,मंगला नेवे,चेतना गवळी,आशा जाधव,पुष्पा परदेशी,सुनंदा नेरकर,उज्वला पाटील,रेखा नेरकर,शकुंतला चौधरी,सविता महाजन,
शोभा जावरे,संगिता निंभोरे,सरला पाटील,
आक्का सपकाळे,बेबी पाटील,रत्ना
सोनवणे,साधना पाटील,शुभांगी बोरसे,वंदना पाटील,वंदना कंखरे,नंदा देवरे,सविता वाघ यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा